मुळशीतील पत्रकार भवनाचा 7 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, पत्रकार संघ मुळशीकडून वळसे व यादवराज फड यांना पुरस्कार प्रदान

महावार्ता न्यूज ः साहित्य हे भावना आणि बुद्धी यातून जन्माला येते . प्रसंगावधान असल्यास घडणाऱ्या प्रसंगातून एखाद्या कांदंबरीचे अथवा कथेचे बीज सापडते. कोणतीही मानवी कृती घडत असताना लेखकाचे लक्ष ती वेधून घेते त्यातला वेगळेपणा टीपून लेखक लिहिता होत असतो. ” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी केले.
पौड (ता.मुळशी) येथील पत्रकार भवनाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार संघ मुळशीच्यावतीने स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे माजी सदस्य दिवंगत पत्रकार दत्तात्रेय सुर्वे यांच्या स्मरणार्थ पत्रकारांसाठी दिला जाणारा आदर्श पुरस्कार मंचर (ता. आंबेगाव) येथील दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील यांना, तर दिवंगत व्यंगचित्रकार बापू घावरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कला क्षेत्रातील गुणवंत कलाकार पुरस्कार पं. भिमसेन जोशी यांचे शिष्य ज्येष्ठ गायक व सर्जनशील संगीतकार यादवराज फड यांना देण्यात आला. श्याम मनोहर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन वळसे व फड यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना वळसे म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारिता अर्थार्जन म्हणून न करता सामाजिक बांधिलकी म्हणून करावी. पत्रकारिता ही उदरनिर्वाहाचे साधन करू नये. त्यासाठी केवळ पत्रकारितेवर अवलंबून न राहता स्वतंत्र व्यवसाय करावा. बातमी करतांना घटनामधील बारकावे शोधावेत.
यादवराज फड म्हणाले, समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करीत असतात . अन्यायाला वाचा फोडून समस्या सोडावीत असतात परंतु त्यांना त्यातून आर्थिक उत्पन्न अल्प मिळत असते .समाजाने , शासनाने पत्रकारांसाठी आर्थिक स्त्रोत मिळवून दिला तर योग्य होईल.
कार्यक्रमास शरद ढमाले , काका धावडे , सुनील चांदेरे , राजेंद्र बांदल , बाळासाहेब चांदेरे , शंकर मांडेकर , गंगाराम मातेरे , डॉ. दिलीप मुरकुटे , अंकुश मोरे , नाना मारणे , तुषार पवळे , बाळासाहेब भांडे , विलास आमराळे , अविनाश बलकवडे , शिवाजी बलकवडे , संदीप मांडेकर , सचिन खैरे , अशोक धुमाळ , सुरेश हुलावळे , कालिदास गोपालघरे , शांताराम इंगवले , बाबा कंधारे , सविता दगडे , महादेव कोंढरे , बाळासाहेब सणस , संतोष मोहोळ , राम गायकवाड , आबा शेळके , दीपक करंजावणे , ज्ञानेश्वर पवळे , रामदास पवळे , ज्ञानेश्वर एनपुरे , संतोष पवळे , विकास पवळे , अण्णा गोळे , राहुल पवळे , दादाराम मंडेकर , प्रमोद मांडेकर , चंदाताई केदारी , लहू चव्हाण , सुनील वाडकर , स्नेहा साठे , आकाश जाधव, प्रा. सोमनाथ कळमकर, विठ्ठल रानावडे, सागर धुमाळ, सतीश सुतार, अनिल आधवडे, स्नेहल सुर्वे, केतन सुर्वे आदी उपस्थित होते.