माय मुळशी
Trending

खासदार सुप्रिया सुळेंकडून नांदेचे नवनिर्वाचित उपसरपंचपदी सुनील जाधवांचा सत्कार

महावार्ता न्यूज: नांदे (ता,मुळशी ) नांदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुनिल सखाराम जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
नांदे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुलाब ढमाले यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सुनील जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नांदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवींद्र देशमुख यांनी काम पाहिले.
सरपंच निकिता रानवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड घेण्यात आली.तेव्हा या निवडीच्या प्रसंगी नांदे ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच प्रशांत रानवडे,सरपंच निकिता रानवडे,आरती रानवडे,गुलाब ढमाले,हेमलता रानवडे,संघमित्रा ओव्हाळ पोलीस पाटील,दत्तात्रय रानवडे,माजी सरपंच मारुती रानवडे,विठ्ठल रानवडे,ग्रामविकास समिती अध्यक्ष रोहिदास रानवडे,तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास करंजावणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डांगे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close