पुणे
Trending
मुळशीत सर्कलसह अनेक गावातील तलाठ्यांच्या होणार बदल्या, चांगली गावे मिळविण्यासाठी तलाठ्याची धावपळ सुरू

महावार्ता न्यूज ः मुळशीत तहसीलदार पदासह तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच सर्कल व गाव तलाठ्याच्या बदल्या होणार आहेत. मे अखेरी होणार्या बदल्या लांबल्याने अखेरच्या क्षणी चांगली गावे मिळविण्यासाठी धावपळ दिसत आहे.

आधिकाधिक महसूल देणारी ताथवडे, भूगांव, पिरंगुट गावासह अनेक सर्कलच्या बदल्या प्रलंबित आहे. अधिक महसूल देणारी गावे मिळविण्यासाठी अनेक तलाठी प्रयत्नशील आहेत. या बदल्यांची नावे निश्चित झाली असून 20 जूननंतर बदल्यांचा आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पिरगुंट परिसरातील तलाठी व सर्कल यांच्या एकत्रितपणे बैठका सुरू झाल्या आहेत.
Share