माय मुळशी
Trending
मुळशीत रविवारी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त रोजगार मेळावा, तालुक्यातील युवकांना नोकरीसाठी मोठी संधी – महादेव कोंढरे

महावार्ता न्यूज ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त मुळशीत 19 जून रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पिरंगुट येथील सुरभी बँक्केट हॉलमध्ये रविवारी 19 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंंत होणार्या रोजगार मेळाव्यात मुळशीती तरूणांना नोकरीची मोठी संधी असल्याचे मेळाव्याचे निमंत्रक व मुळशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन होईल. मेळावा विनामूल्य असून 18 ते 35 वर्षांच्य तरूणांसाठी खुला आहे. मेळाव्याती मुलाखतीव्दारे निवडल्या गेलेल्यांना राज्यातील विविध कंपन्यांमध्ये ऑन द जॉब ट्रॅनिंगची संधी उपलब्ध होणार आहे. 17 जूनपर्यंत मेळाव्यासाठी नावनोंदणी असून वरील मोबाईल नोंदणीसाठी संपर्क साधावा मो. 9823593749 व 9960369169
Share