राजकीय
Trending

पेरीविंकलच्या पिरंगुट शाखेत जागतिक योगदिन साजरा, योगाचार्य स्वामी शिवानंद महाराजांची  उपस्थितीमुळे परिसर योगामय

महावार्ता न्यूज:  पेरीविंकलच्या  पिरंगुट शाखेतील योगदिन स्वामी शिवानंद महाराजांच्या उपस्थितीत साजरा झाला. दिल्लीस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मठाधिपती – इंचगिरी मठ यांचे प्रत्यक्ष दर्शन आणि अध्यात्मिक आणि योग या संदर्भातील मार्गदर्शन हा  दुग्ध शर्करा योग पिरंगुट शाखेत जुळून आला.

कोणतीही पूर्व नियोजित भेट आणि मार्गदर्शन सत्राचे पूर्व नियोजन नसूनही एका दिवसात  स्वामी शिवानंद महाराजांना  योग दिन मुळशीत साजरा झाला. याप्रसंगी  शिवानंद महाराजांबरोबर माजी आमदार शरद ढमाले व भाजपचे जिल्ह्यानेते चोरघे ,शिवानंद महाराजांचे शिष्य पत्रकार शंकर चव्हाण , पत्रकार संजय दुधाणे , लहुजी साळवी महामंडळ सदस्य बाळासाहेब भांडे ,सेना नेते राम गायकवाड, जगदीश लांडगे पौड सरपंच ,योगेश सोनवणे ,निलेश कदम यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.
 योगाचार्यांचे शाळेत आगमन झाले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्च्या स्वागत समितीने त्यांचे ढोल आणि ताशांच्या गजरात औक्षण करून स्वागत केले.
पेरीविंकल समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद बांदल यांनी शाल आणि श्रीफळ तसेच पुष्प गुच्छ देऊन स्वामींचे जंगी स्वागत केले. स्वमालकीच्या जागेत नुकत्याच स्थलांतरित झालेल्या शाळेच्या प्रशस्त टेरेस वर सदर कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. विद्यार्थी स्थानापन्न झालेच होते. त्यांनीही उभे राहून स्वामींना मानवंदना दिली. दीप प्रज्ज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. योगविषयक श्लोकांच्या पठणा तून स्वामींनी योगा, त्याची गरज आणि महत्व सोप्या भाषेत विशद केले. मानवी आयुष्यातील योगासनांचे महत्व सांगितले. योगा म्हणजे शरीराचे आणि मनाचे आणि आत्म्याचेही सौदर्य, उर्जेची वाढ, स्वत:चा स्वत: मधून स्वत:कडे केलेला प्रवास म्हणजे योगा अशी साधी पण मनाला भावणारी व्याख्या त्यांनी सांगितली.
योगा म्हणजे कृतीमधील सौदर्य, योगा म्हणजे आपल्या स्वत:कडे आतून बघण्याचा आरसा, आजच्या या बदलत्या आणि धावपळीच्या जगात आपल्या सगळ्यांनाच योगा अनुसरणे गरजेचे आहे, मनावर नियंत्रण ठेवण्या साठीही योगा सहायभूत ठरतो, चित्त वृत्ती निरोध: उत्युक्ते योगा: अशी थोडक्यात ओळख मुख्याध्यापक अभिजित टकले सरांनी करून दिली.
आजच्या कार्यक्रमासाठी पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजित टकले, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे यांचा उत्साही सक्रीय सहभाग कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी करण्यात यशस्वी ठरला.
बावधान शाखेच्या मुख्याध्यापिका रुचिरा खानविलकर, सुस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी तसेच पौड शाखेच्या पर्यवेक्षिका जिनी नायर यांचे आपापल्या शाखेत योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कार्यक्रमांची रेलचेल, विविध मान्यवरांच्या भेटी, त्यांचे समयोचित मार्गदर्शन , अभ्यास आणि अभ्यास पूरक इतरही सर्व अनुभवांचे आदानप्रदान हे पेरीविंकल समूहाच्या बावधान, पिरंगुट, सुस आणि पौड सर्वच शाखामध्ये शत प्रतिशत होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close