माय मुळशी
Trending
पिरंगुटचा तबलावादक आदर्श विद्यार्थी विराज गावडे दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम

पिरंगुट इंग्लिश स्कूल पिरंगुट शाळेचा विद्यार्थी विराज संतोष गावडे हा तब्बल 97.80 % इतके गुण मिळवून मुळशी तालुक्यात प्रथम आला आहे. आतापर्यंत शाळेच्या स्थापनेपासूनच्या निकालातील हे सर्वाधिक वैयक्तिक गुण आहेत. त्याला अनेक वेळा गुणवंत व आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले आहे. तो इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत आला होता. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारणेवाडी या ठिकाणी झाले होते. त्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे. तो आत्तापर्यंत राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, बुद्धीप्रामाण्यवादी शोध परीक्षा, जूनियर आयएस आदि स्पर्धांमध्येही राज्य स्तरावर चमकला आहे. तसेच तो उत्तम तबलावादकही आहे. त्यांने आत्तापर्यंत अनेक वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वरूपवर्धिनी मार्फत घेतली जाणारी प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्येही अनेक बक्षिसे मिळविली आहेत. त्याला त्याचे वडील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शिक्षक संतोष गावडे, शाळेचे प्राचार्य चव्हाण सर, उपप्राचार्य कुसाळकर सर, पर्यवेक्षिका डोंगरे मॅडम, वर्गशिक्षिका खेडेकर मॅडम, शेंडगे सर, जगताप एम व्ही, माझीरे मॅडम, शिंदे सर, सोनवणे सर, कळमकर सर, बढे मॅडम,खराडे मॅडम, गाडेकर मॅडम, भिसे सर, घाटगे सर,प्रवीण सातव आदि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, पंचायत समिती पौड यांनी कौतुक केले आहे.
Share