
महावार्ता न्यूज: शुक्रवार दि.१ जुलै2022 रोजी चैतन्य विद्या प्रतिष्ठान मच्या पेरीविंकल इंग्लीश मीडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज च्या सूस शाखेत डॉक्टर दिन मोठ्या आनंदात व उत्सहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने सरस्वती पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे मान्यवर मणिपाल हाॅस्पिटलचे डॉ. भूषण लुंपाटकी व नवले हाॅस्पिटलच्या डॉ. शिल्पा आचार्य हे उपस्थित होते. पेरिविंकल स्कूल च्या संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी डॉक्टर दिनाचे औचित्य साधून उपस्थित डॉक्टर यांना पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित केले.
इयत्ता ९ वी, १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यानी डॉक्टर दिना निमित्य नाटक नृत्य ह्याच्या सादरीकरणातून डॉक्टरांच्या कामगिरी चे सादरीकरण केले. जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या
पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या सुस शाखेमध्ये डॉक्टर दिना निमित्य कार्यक्रम अत्यंत उत्यासाहत साजरे करण्यात आले.
कोविडच्या महामारीच्या काळात डॉक्टरांनी आपला जीव पणाला लावून समाजाकरिता जे कार्य केले त्या करिता आपण त्यांचे आभार मानायला हवे . असा विचार केले तर डॉक्टर समाजासाठी वरदानच आहे .
डॉक्टरांना संदेश आणि मानवंदना देण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर ,संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम उपस्थितीत होते.
डॉक्टर हे देव नसून देवासमान आहे हे आपण विसरून जातो.त्यांचा बद्दल समाजात जागरूकता निर्माण ह्यावी या करिता पेरीविंकल ने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला .
डॉक्टर हे केवळ डॉक्टर नसून देवदूत आहेत असे शळेच्या संचालिका रेखा बांदल मॅडम यांनी सांगितले .
शळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी डॉक्टर ही लाइफ लाईन असून केवळ उपचार च नव्हे तर वेळ प्रसंगी पालक म्हणून देखील कोविड मध्ये सर्व डॉक्टरानी जी काळजी घेतली त्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार मानले .
डॉक्टर भूषण सर व डॉक्टर शिल्पा मॅडम यांनी हा असा आगळा वेगळा डॉक्टर्स डे साजरा करणारी प्रथमच शाळा बघितली असे सांगून विद्यार्थ्यांनी केलेल्या परफॉर्मन्स ने खरंच मन भरून आले असे मत व्यक्त करून विद्यार्थी व शाळेचे कौतुक केले . आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. शुभा कुलकर्णी यांच्या सहयोगाने करण्यात आले होते . सौ. श्रद्धा गायकवाड मॅडम आणि श्री. सचिन खोडके सर आणि सर्व शिक्षकवृंदांच्या सहकार्याने डॉक्टर्स डे चा कार्यक्रम अत्यंत आनंदात ,उत्सहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला .
Share