
महावार्ता न्यूज: मुळशीतील पिरंगुट जवळील
लवळे फाटा येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने
तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन
महिला व नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश
आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
लवळे फाट्यावर फरशीने भरलेला ट्रक पौडच्या दिशेने जात होता. त्याच्या पुढे दोन दुचाकी व एक चारचाकी अशी तीन वाहने प्रवाशांसह जात होती. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोरील 3 वाहनांना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यावेळी पुढील बाजूस सीबीझेड या दुचाकीवर बाळासह चाललेले दांपत्यांना जोरदार ठोकरल्याने बाळ व आईचा जागीच मृत्यू झाला आहे.
दुसऱ्या दुचाकीवरील एका महिलेला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करताना मृत्यू झाला आहे. रेडमी पवन पटेल (वय ३० ) व रिहान पवन पटेल ( वय ९ महिने) यांचा जागीच मृत्यू झाला असून दवाखान्यातील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव
समजू शकलेले नाही.
पोलिस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी जखमींना मदत करणार्यासाठी पिरंगुट ग्रामस्थ धावले.
किरण गोळे, महादेव गोळे (युवा नेते) अमर निकटे ( ग्रा. स. पिरंगुट) ,विशाल म्होकर, नामदेव धोत्रे
शंकर बिरादार,अमित निकटे, किरण देव,प्रशांत भोसले हे तातडीने दाखल होऊन त्यांनी जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले.
Share