माय मुळशी
Trending
सरपंच निलेशभाऊ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वारक-यांना वारीच्या साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांना मदतीचा हात

महावार्ता न्यूज ः लवळे येथे सरपंच निलेशभाऊ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वारक-यांचा वारीसाठीचे साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले
सरपंच निलेशभाऊ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील रोटमलनाथ मंदिर परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. ह. भ. प. किर्तन केसरी वांजळे महाराज यांचे किर्तन सेवेने कार्यक्रमाला सुरवात झाली. तसेच आळंदी ते पंढरपुरला पायी करणारे वारकरी, ग्रामस्थ, कीर्तनकार, विद्यार्थी यांना उद्योजक नाथाजी राऊत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर मांडेकर, मा. सभापती महादेव कोंढरे मा.सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर, तसेच निलेश गावडे यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले
यावेळी दगडू काका करंजावणे, स्वातीताई ढमाले, मानचे उपसरपंच पप्पू शेठ धुमाळ, रामभाऊ गवारे, राफिकभाई शेख, राम गायकवाड, प्रशांत रानवडे , सरपंच आरती रानवडे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल साकोरे, रंजित राऊत, संजय सातव, शिवराम सातव, बाळासाहेब राऊत, अजित चांदीलकर, राहुल खरात, नर्मदा टकले, सुजाता मोरे, राणी केदारी, किमया गावडे, सारिका कळमकर, वर्षा राऊत, सायली सातव, साधना सातव, बाळासाहेब टकले दत्तात्रय मोरे, गणेश गावडे, महेश सातव, अमोल सातव , ऋषिकेश राऊत, पोपट कळमकर, सुरज केदारी, गणेश शितोळे, मच्छिंद्र काशिलकर, सर्जेराव तांगडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Share