
महावार्ता न्यूज: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले खारावडे ( ता.मुळशी ) येथील म्हसोबा भैरवनाथ काळूबाई मंदिर ट्रस्ट चे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. जवळपास 30 वर्षांची बिनविरोध ची परंपरा कायम ठेवली आहे. सभासदांनी निवडणूक बिनविरोध करुन तालुक्याला गावाची एक्की दाखवून दिली.
मंदिरामध्ये एकाच बैठकीत हि निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी सर्वानुमते विश्र्वस्त म्हणुन सौ.मधुरा भेलके, दिनेश जोगावडे , शंकरराव मारणे, लक्ष्मण मारणे, विष्णुपंत जोगावडे, विलास सोनावणे, संभाजी गावडे, अनिल सोनावणे, मारुती माने, माऊली साळेकर, नरेश मारणे, हर्षल मारणे, तेजस जोगावडे संतोष मारणे, संतोष चव्हाण यांची निवड करणात आली. यावेळी अनेक सभासद उपस्थित होते.
तसेच यावेळी विश्र्वस्ताच्या सर्वानुमते म्हसोबा देवस्थानांच्या अध्यक्षा म्हणुन सौ.मधुरा भेलके, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकरराव मारणे, खजिनदार लक्ष्मण मारणे या पदाधिकार्याची बिनविरोध निवड झाले. यावेळी बिनविरोध निवडून आलेले पदाआधिकार्याचा म्हसोबा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अनेक सभासद उपस्थित होते.
Share