राजकीय
Trending

गुणवंत शिक्षकांच्या सन्मानाने पेरिविंकलच्या सूस शाखेत गुरुपौर्णिमा साजरी

महावार्ता न्यूज:  चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल सूस शाखेत गुणवंत शिक्षकांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा  उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षी आषाढ़ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करतात.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सुसच्या पेरिविंकल  शाळेतील विद्यार्थी गुरूजनांची कृतज्ञता व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व व्यास ऋषीच्या  प्रतिमेचे व पादुकांचे पूजन करून करण्यात आली. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी गुरूंच्या प्रतिमेचे पूजन केले.या प्रसंगी कुस्तीवीर सुवर्ण पदक विजेते  रणजित नलवडे , मा. नगरसेवक राजाभाऊ गोराडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री पाचपोरे , आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संजय दुधाणे , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थ्याच्या गुरुगीतने करण्यात आली. इयत्ता 10वी तील सतीश यादव व 9वी तील स्वरा चौधरी या विद्यार्थ्यांनी गुरुविषयी माहिती देऊन गुरूंचे महत्व स्पष्ट केले.
गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व गुरूजन- शिक्षकांचा शाल श्रीफळ व गुलाब देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व विद्यार्थी शिष्यांसमोर गुरूजनांच्या हस्ते सन्मान मिळणे हीच खरी गुरुदक्षिणा असे प्रतिपादन करून गुरूंचे महत्व शाळेच्या
मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी केले.

गुरूच्या आज्ञेचे पालन करून निशंक मनाने काम केल्यास प्रगतीच होते व गुरुबळ म्हणजे काय याची प्रचिती येते असे संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांनी त्यांच्या भाषणात सांगितले व सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या . तर आपली संस्कृती जपून गुरुपौर्णिमा शाळेत साजरी करून खरच पेरिविंकल आपल्या भारतीय संस्कृतीचे पालन करून सगळ्यात अव्वल दर्जाची आहे असे  राजाभाऊ गोराडे यांनी सांगितले.
कुस्तीगीर रणजित सर यांनी आज येथे आमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे व शाळेचे हे सगळे नयनरम्य कार्यक्रम अनुभवायला मिळाल्याने सर्वांचे आभार मानून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यकमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित ह्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक सौ. शुभा कुलकर्णी , श्री. सचिन खोडके सर, सौ. श्रध्दा गायकवाड यांच्या तसेच सर्व शिक्षकवृंद ह्यांच्या सहकार्याने अतिशय आनंदात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close