राजकीय

मुळशीत सौम्य भुकंपाने तब्बल 500 मीटर लांब जमिन दुभंगली, वाघवाडीत माळीण सारखी भूस्खलन सदृश्य स्थिती, ग्रामस्थ सुरक्षित स्थलांस्तरीत, 15 घरांचे पुर्नवसन कोण करणार ?

मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदिप जठार यांची घटनास्थळी पाहणी

महावार्ता न्यूज: मुळशी धरण भागातील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे सौम्य भूकंप सदृश स्थितीमुळे 12 जुलैपासून साधारणत: पाचशे मीटर लांब अशी भेग पडलेली असून भेगेची टाटा तलावाकडील जमीन साधारणत: एक ते दीड फूट खाली खचलेली आहे. वाघवाडीत माळीण सारखी भूस्खलन सदृश्य स्थिती असून 12 ग्रामस्थांना जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित स्थलांस्तरीत करण्यात आले आहे. टाटा धरणाच्या मालकी क्षेत्रातील 100 वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या हक्काच्या गावठाणासाठी लढा देणार्‍या या वाडीतील 15 घराचे पुर्नवसन टाटा करणार की शासन हा मोठा प्रश्न आहे.
जमीन खचण्याचे प्रमाण वाढत असल्याने, (दोन्ही गावातील  प्रत्येकी 15 ते 16 उंबरठे)नागरिकांना तातडीने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे.दोन्ही गावांमधील जमीन ही टाटाची असल्यामुळे; टाटा प्रशासनाशी मुळशी तहसीलचे बोलणे झाले असून, तातडीने नागरिकांना तात्पुरती मदत करणे बाबत कळविले आहे.
सौम्य भूकंपामुळे  जमीन खचण्याची शक्यता  व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या मदतीने पंचनामा करून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याची दक्षता घेत आहोत तातडीने संचालक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, भारत सरकार पुणे यांना कळविणे आवश्यक आहे
– अभय चव्हाण, तहसीलदार 

 

ग्रामपंचायत वडगांव अंतर्गत वाघवाडी (पाटील वस्ती) येथील डोंगर भागाला मोठ्या प्रमाणात  भेगा पडलेल्या असून डोंगर परिसरामधील सिमेंट रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. घरांच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहे. जमिन सरकल्यामुळे पिण्याचे पाण्याची पाईपलाईन आपोआप वर उचलून आलेली आहे. परिस्थिती पाहता भूस्खलन होण्याची धोका असल्याने येथील ग्रामस्थांचे
कायमस्वरुपी पुनर्वसन होणे आवश्यक आहे

– संदिप जठार, गटविकास अधिकारी

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close