
महावार्ता न्यूज ः मुळशीतील सर्वाधिक श्रीमंत आय टी नगरीतील हिंजवडीतील ग्रामपंचायतीच्या त्रैमासिक सरपंच पदाची बुधवार 20 जुलै रोजी निवडणुक होणार असून पाचवे सरपंच होण्याचा मान मच्छिंद्र हुलावळे यांना मिळणार आहे.
ग्रामविकास श्री. म्हातोबा परिवर्तन पॅनेलच्या कोअर कमिटीमध्ये ठरल्यानुसार शिवनाथ जांभुळकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होत आहे. गणेश जांभुळकर, विक्रम साखरे, विशाल साखरे, शिवनाथ जांभुळकर या पूर्वीचे सरपंच होते. आता पाचवे सरपंच पदी मच्छिंद्र हुलावळे यांच्या नावाला ग्रामविकास श्री. म्हातोबा परिवर्तन पॅनेलच्या कोअर कमिटीने हिरवा कंदील दर्शविला आहे.
माजी सरपंच मल्हारी साखरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष साखरे,मुळशीचे युवा नेते सुरेश हुलावळे, माजी सरपंच तानाजी हुलावळे, शामराव हुलावळे,अॅड. शिवाजी जांभुळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ निवडणुक प्रक्रियेला उपस्थित राहणार आहेत.
ग्रामपंचायतचे माजी सरपंच गणेश जांभुळकर, विक्रम साखरे, विशाल साखरे, शिवनाथ जांभुळकरसह विद्यमान सदस्य सचिन जांभुळकर, प्रदीप वाघमारे, मनीषा हुलावळे, रेखा साखरे, प्रतीक्षा जांभुळकर, शिवानी जांभुळकर, दीपाली जांभुळकर, पल्लवी गंगावणे, ऐश्वर्या वाघमारे यांचा पाठिंब्यामुळे मच्छिंद्र हुलावळे यांची बिनविरोध निवड होणार आहे.
Share