पुणे
Trending

दस्तुरखुद्द तहसीलदार चव्हाणांकडून मुळशीतील विद्यार्थ्यांना दाखल्यांचे घरपोच वाटप, पौडमधील महा ई सेवा केंद्राचे संचालक सुहास शेंडे टीमने घेतली मेहनत

महावार्ता न्यूज: दहावीच्या परीक्षेचा निकाल दिल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वांत मोठा प्रश्‍न असतो, तो पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांची जुळवाजुळव करण्याचा. मात्र, मुळशी धरण भागातील ११ शाळांतील विद्यार्थ्यांना थेट घरपोच दाखले मिळाले. यासाठी दस्तुरखुद्द तहसीलदार अभय चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन दाखले दिल्याने विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची आर्थिक व मानसिक त्रासातून मोठी सुटका झाल्याने जागृत प्रशासनाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे
मुळशी धरण परिसरातील ११ शाळांमधील दहावीची परीक्षा दिलेल्या एकुण २८० विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मोफत दाखले वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे स्वतः तहसीलदार अभय चव्हाण यांनी थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन या दाखल्यांचे वाटप केले.
या उपक्रमासाठी मुळशी धरण भागातील शाळांध्ये अर्ज स्वीकृतीचे शिबीरे घेण्यात आली होती. त्यामध्ये, जातीचे दाखले डोमासाईल दाखल्यांसाठी पालकांनी अर्ज केले होते. त्याची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तहसीलदार कार्यालयातून मंजुर करण्यात आले.
दरम्यान, शैक्षणिक कामासाठी हे दाखले आवश्‍यक असतात. मात्र, ते मिळविताना विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकाना खुप मोठा मानसिक व आर्थिक त्रास नेहमीचाच होत असतो. त्यातून त्यांचा प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. याचा विचार करून रवींद्र उर्फ बाबा कंधारे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. या उपक्रमासाठी पौड येथील महा ई सेवा केंद्राचे संचालक सुहास शेंडे व त्यांच्या टीमने मेहनत घेतली.
या दाखल्यांचे वाटप करताना मुख्याध्यापक चव्हाण सर, बनसोडे सर, स्वामी सर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुका उपाध्यक्ष बबनराव धिडे, माजी सभापती तुकारामभाऊ टेमघरे, माजी सरपंच काशिनाथ शिंदे, पंढरीनाथ धिडे, पोपटभाऊ दुडे, अनिल जाधव, सहादू टेमघरे, विश्वास टेमघरे, संभाजी कालेकर, पांडुरंग कालेकर, दत्तात्रेय टेमघरे, नवनाथ पालकर, सनी पालकर, सरपंच साक्षी जाधव, उपसरपंच भाशीन भाई मुलाणी, अमोल झिंडे, समाधान खडके, भरत सातपुते, आदी उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close