राजकीय
Trending
भुगावमधील जोर स्पर्धेत ४९३ स्पर्धकांचा सहभाग, अक्षय सातपुतेंच्या वाढदिवसानिमित्त मुळशीकरांचे आरोग्य प्रबोधन

महावार्ता न्यूज : भुगावचे माजी आदर्श सरपंच अक्षय सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने संघर्ष स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने जोर स्पर्धेचे भूगावमध्ये आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये ४९३ स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. यामध्ये दहा वर्षाखालील प्रथम क्रमांक
पै श्रेयस निळकंठ बिराजदार (भूगाव) द्वितीय क्रमांक
पै अविनाश कोकाटे(नांदेड सिटी ),तृतीय क्रमांक पै श्रेयस दिनेश देडगे(नांदेड सिटी) पंधरा वर्षा खालील गट प्रथम क्रमांक पै ओमकार जाधव(पौड),द्वितीय क्रमांक पै अजिंक्य रानवडे (औंध),तृतीय क्रमांक पै परीक्षित मगर.
पंधरा वर्षावरील खुला गट प्रथम क्रमांक
पै यश हरिदास पवार(भूगाव),द्वितीय क्रमांक पै अभिजीत शिंदे(उरवडे ),तृतीय क्रमांक पै संदीप ज्ञानेश्वर पवार
(भूगाव)अशा विविध वजन गटातील विजेते स्पर्धक आहेत. याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये झाली आहे.
या स्पर्धेमध्ये विजेत्यांना रोख रक्कम तसेच पौष्टिक खुराक देण्यात आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आहे. येथील शंभू महादेव मंदिरामध्ये ही स्पर्धा झाली आहे. मुळशी तालुका हा कुस्ती पंढरी म्हणून ओळखला जातो याच कुस्ती पंढरीला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी पैलवानांचा उत्साह वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते असे अक्षय सातपुते यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित वस्तादांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणुन काम पाहिले. तसेच यावेळी माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जुन्या जाणत्या पैलवान आणि वस्ताद मंडळींचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सन्माननीय सुनील चांदेरे, महादेव अण्णा कोंढरे, दगडु काका करंजावणे, मा आदर्श सरपंच विजयनाना सातपुते, नगरसेविका अल्पनाताई वरपे, ॲड गणेश वर्पे, आबासाहेब शेळके,शिरूर तालुका माजी सभापती सुभाष उमाप, अंकूश अण्णा घारे, बाळासाहेब चोंधे , निवृत्ती शेडगे, नारायण करंजावणे, एकनाथ शेडगे, लक्ष्मण पोळ, बापू खानेकर,दत्तात्रय करंजावणे, सचिन मिरघे, पंढरीनाथ शेडगे, शाम घारे, सुहास शेडगे, अमर शेडगे, विनायक शेडगे, वस्ताद निवृत्ती आबू माझिरे, नामदेव अण्णा माझिरे, सचिन करंजावणे, पै गोविंद आंग्रे, पै उमेश पवार, कुमार भारत केसरी पै.धनराज करंजावणे, पै अक्षय घारे, सोपान सुर्वे, नामदेव सांगळे, बापू भागवत, राहूल करंजावणे, दिपक येनपुरेउपस्थीत होते या स्पर्धेचे आयोजन संघर्ष स्पोर्ट्स चे प्रशांत साळेकर, राहुल कांबळे, विद्यमान ग्रा सदस्य अमित घारे, बोतरवाडी मा सरपंच समीर शेलार, संजय गायकवाड, सूरज शेडगे व अक्षय सातपुते मित्रपरिवार यांनी केले होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री अनिल चोंधे आणि वस्ताद नवनाथ माझिरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन बाळासाहेब शेडगे यांनी केले.
फोटो ओळ
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना मान्यवर.
Share