
महावार्ता न्यूज: महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते मा.ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिरंगुटमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पेन ड्राईव्ह वाटप करण्यात आले.
यावेळी पिरंगुटचे मा. उपसरपंच श्री महादेव गोळे, श्री प्रवीण कुंभार, विकास पवळे, छाया पवळे, ग्रामपंचायत सदस्या सौ प्रतीक्षा आवळे, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष रोहिदास गोळे, जय तुळजा भवानी ट्रस्टचे अध्यक्ष सचिन पवळे, युवा नेते सागर पवळे, दीपक आवळे, साहिल पवळे उपस्थित होते. श्री शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा पवळे आणि पिरंगुटचे मा. उपसरपंच व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष श्री. राहुल पवळे यांच्या वतीने राज्याचे मा. उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त पेन ड्राईव्हचे वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरंगुट, विद्या भवन प्रायमारी स्कूल पिरंगुट, या ठिकाणी वाटप करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्या वतीने आदरणीय नामदार अजित पवार साहेबांचा वाढदिवस मान्यवारंच्या उपस्थिती मध्ये केक कापून साजरा करण्यात आला.
Share