
महावार्ता न्यूज: पिरंगुटमधील प्रगतशील शेतकरी व पवळे परीवाराचे मार्गदर्शक शिवाजीराव सतु पवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
मुळशी तालुका पंचायत समितीचे मा. सभापती कै. बाळासाहेब सोपानराव पवळे व पिरंगुट गावचे सरपंच चांगदेव निवृत्ती पवळे यांचे ते बंधु, लेखक व आंतरराष्ट्रीय पत्रकार संजय पांडूरंग दुधाणे यांचे ते मामा आजोबा होते.
त्याच्यामागे पत्नी, 4 मुले, 1 मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम मंगळवार दि. १६/८/२०२२ रोजी सकाळी ९ वा. प्रयागधाम स्मशानभुमी पिरंगुट येथे होईल. समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगुट, बालवीर युवक मंडळ पिरंगुट कॅम्प, पिरंगुट व्यापारी महासंघाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दुधाणे परिवार व महावार्ता न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली
Share