माय मुळशी
Trending
मुळशीतील ग्रामसेवकाकडून आडमाळ गावात जातीभेद, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात कातकरी समाजातील महिला सदस्याला सापत्न वागणूक

महावार्ता न्यूज: देशपातळीवर एकीकडे आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती पदावर विराजमान होत असताना दुसरीकडे मुळशीतील आडमाळ गावात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ग्रामसेवकांकडून जातीभेदाचा प्रकार घडला आहे. कातकरी समाजातील ग्रामपंचायत सदस्याला सापत्न वागणूक मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकांचे बदली करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त आडमाळ ग्रामपंचायतीतील 75 वर्षांच्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात सन्मान चिन्हात ग्रामपंचायत सदस्या सुरेखा वाघमारे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप कातकरी समाजाने केला आहे. आमच्यासोबत असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्रामसेवक जगन्नाथ भोंग यांची बदली करण्याची मागणी आडमाळ ग्रामस्थांनी केली आहे.या घटनेचा निषेध वंचित आघाडीकडून केला जात आहे.
याबाबत ग्रामसेवक जगन्नाथ भोंग यांनी सन्मान चिन्हात चुका झाल्याचे सांगितले असून त्याबाबत सन्मानिय समस्यांकडे दिलगिरी व्यक्त केली जाईल असेही भोंग यांनी सांगितले आहे
Share