राजकीय
Trending
मुळशीत भोसरीतील फूलविक्रेत्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला, 7 दिवसापूर्वीच खून झाल्याचा संशय

महावार्ता न्यूज: भोसरी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता
असलेल्या फूलविक्रेता तरूणाचा मृतदेह घोटावडे
(ता. मुळशी) येथील घोटावडे व माण या दोन
गावच्या सीमेवर असलेल्या बापूजीबुवा खिंडीत
कुजलेल्या अवस्थेत पौड पोलिसांना मिळून
आला आहे. बेपत्ता झाल्यापासून 7 दिवसापूर्वीच खून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
मयत प्रशांत आनंदा डोळस (वय ३०, रा.
भोसरी) असे मृताचे नाव आहे. तो शनिवारपासून
(ता. २०) बेपत्ता झाला होता.याप्रकरणी अस्मिता
प्रशांत डोळस ( वय २८ वर्षे, रा डोळस वस्ती बुद्ध
विहाराचे मार्गे पी एम टी चौक अशोकनगर
भोसरी ) यांनी भोसरी पोलिस स्टेशनला खबर
दिली होती.शुक्रवारी ता. २६ रोजी दुपारी एक
वाजण्याच्या सुमारास येथील खिंडीत त्याचा
मृतदेह आढळला. घोटावडे गावाकडून
हिंजवडीकडे जाताना बापूजीबुवा खिंडीत गर्द
झाडी लागते. यामध्ये गावातील गुराख्यांना हा
मृतदेह दिसला होता.
२० ऑगस्ट रोजी जेवणाचे पार्सल घेवून
येतो असे सांगून राहते घरातून तो निघून गेला
होता.मृतदेह असलेल्या ठिकाणी मोठी दुर्गंधी
सुटली होती. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन
समितीचे प्रमोद बलकवडे, पोलिस पाटील दिपक
मातेरे यांनी कुजलेला मृतदेह हलविण्यासाठी
मदत केली.
मुळशी तालुक्यातील बापूजीबुवा घाटात मिळाला अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. हिंजवडी माण आयटीपार्क पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बापूजीबुवा घाटात घोटवडे गावच्या हद्दीत छिन्नविछिन्न अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली . अंदाजे आठवडाभरापूर्वी हा मृतदेह इथे आणून टाकला असावा असा अंदाज पौड पोलिसांनी व्यक्त केला.
पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटावडे व हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माण गावच्या सीमेवरील बापूजीबुवा घाटात डोंगर उतारावरील नाल्या लागत झुडपात हा मृतदेह पोलिसांना आढळला.
मृतदेह बाहेरून आणून टाकला असण्याची शक्यता मृतदेह एवढा छिन्नविच्छिन्न झाला होता की कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना त्याची ओळख पटने आव्हानात्मक होते असे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. हा मृतदेह पिंपरी चिंचवड शहरांतून आणून या झाडाझुडुपांमध्ये टाकला असावा अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचे डोके धडापासून वेगळे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले त्यामुळे खात्रीशीरपणे हा खुनाचाच प्रकार असल्याची कुजबुज तालुक्यात सुरू आहे.
Share