खेळ खेळाडू
Trending
क्रीडादिनानिमित्त पुण्यात वैद्यक शास्त्र तंज्ञवैद्यक, आहारशास्त्राचे खेळाडूंना मार्गदर्शन, पुणे ट्रायथलॉन संघटनेच्यावतीने आयोजन

पुणे ः पुणे ट्रायथलॉन अँड अॅक्वॅथलॉन संघटनेच्यावतीने 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून क्रीडायशाचा मार्ग – वैद्यकशास्त्र, आहारशास्त्र विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सनसिटी जवळील आनंद फिटनेस व्हिजनच्या सभागृहात सोमवारी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता क्रीडा वैद्यक शास्त्र तंज्ञ डॉ. अजित मापारी व क्रीडा आहारतंज्ञ सौ. अपर्णा बर्डे खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पुणे ट्रायथलॉन अँड अॅक्वॅथलॉन संघटनेचे अध्यक्ष संजय दुधाणे मेजर ध्यानचंद यांच्या यशोगाथेला उजाळा देणार आहे. याप्रसंगी गुजरात येथे होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या क्रीडापटूंचा गौरव केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव मिलनकुमार परदेशी यांनी दिली आहे.
Share