खेळ खेळाडूमाय मुळशी
Trending
मुळशी क्रीडाभूषण संदिप पवार जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरवित, जिल्ह्यातून अभिनंदनांचा वर्षाव

महावार्ता न्यूज: कासारअंबोलीतील सैनिकी शाळेचे कार्यशील क्रीडा शिक्षक व मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघाचे सचिव , संदीप सदाशिव पवार यांना गुणवंत जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
२९ आॅगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे,पूना काॅलेज वतीने जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते संदीप पवार यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य श्री.आफताब शेख , क्रीडाधिकारी दादा देवकाते, श्रीताहेर आसी आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीप पवार हे सैनिकी शाळेत गेली २३ वर्ष क्रीडा व हिंदी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत,आजवर संदीप पवार यांना नेहरू युवा केंद्र ,भारत सरकार जिल्हा युवा पुरस्कार, गुरुवर्य पुरस्कार,राजीव गांधी पुरस्कार,,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार ,माय मुळशी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.
मुळशीत क्रीडा संस्कृती रूजविण्यासाठी प्रयत्न केले,भरे क्रीडा संकुलात सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले ,मुळशी तालुक्यात अनेक शासकीय स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले.
पुरस्काराबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा कांबळे , कमांडंट विंग कमांडर श्री.यज्ञरमण ,कॅम्पस डायरेक्टर सौ.गीतांजली बोधणकर यांनी अभिनंदन केले आहे.
Share