खेळ खेळाडू
Trending
महाराष्ट्रातील खेळाडूंना स्पोर्टस् सायन्सची गरज ः डॉ. अजित मापारी, क्रीडादिनानिमित्त पुण्यात ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा, राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

पुणे ः महाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची क्षमता आहे, मात्र त्यांनी स्पोर्टस् सायन्सचा आधार घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन क्रीडा वैद्यक शास्त्र तंज्ञ डॉ. अजित मापारी यांनी पुणे ट्रायथलॉन अँड अॅक्वॅथलॉन संघटनेच्या राष्ट्रीय क्रीडादिनाच्या कार्यक्रमात केले.
सनसिटी जवळील आनंद फिटनेस व्हिजनच्या सभागृहात पुणे ट्रायथलॉन संघटनेच्यावतीने 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडायशाचा मार्ग – वैद्यकशास्त्र, आहारशास्त्र याविषयावरील व्याख्यान आणि राष्ट्रीय क्रीडापटूंचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ. अजित मापारी व क्रीडा आहारतंज्ञ सौ. अपर्णा बर्डे, पुणे ट्रायथलॉन अँड अॅक्वॅथलॉन संघटनेचे अध्यक्ष संजय दुधाणे, सचिव मिलनकुमार परदेशी, क्रीडा संघटक अनिरूध्द पुरंदरे,नरेंद्र बकरे, मोरेश्वर रत्नोजी आदी मान्यवर उपस्थित होते.

मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडादिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील यशोगाथेला लेखक संलय दुधाणे यांनी उजाळा दिला. क्रीडा आहारतंज्ञ सौ. अपर्णा बर्डे यांनी खेळाडूंच्या जडणघडणीत भारतीय आहारचे महत्त्व विशद केले.
रात्री झोपण्यापूर्वी 45 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही पाहून झोपल्यानंतर खेळाडूंच्या कामगिरीत फरक पडतो असे सांगून डॉ. अजित मापारी पुढे म्हणाले की, मेंदूला ताण न देता रात्री खेळाडूंची शांत झोप झाली पाहिजे. यासारख्या छोट्या छोट्या बाबींवर क्रीडा शास्त्र आधिरीत आहे. त्यानुसार आपल्या खेळाडूंनी स्पोर्टस् सायन्सचर वापर अधिक केला तर हरियाणा, पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते होतील.
मेजर ध्यानचंद व ऑलिम्पिक खाशाबा जाधव यांचे चरित्र पुस्तक, पुष्प देत पुण्यातील 17 राष्ट्रीय खेळाडूंचा डॉ. अजित मापारी व अपर्णा बर्डे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मलनकुमार परदेशी यांनी केले तर आभार अनिरूध्द पुरंदरे यांनी मानले.
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त कबड्डीपटू स्नेहल शिंदेचा गौरव करताना सौ. अपर्णा बर्डे, डावीकडून मिलन कुमार परदेशी, बर्डे, डॉ. अजित मापारी,संजय दुधाणे.
Share