क्राइम
Trending

मुळशीतील कुजलेल्या मृतदेह खुनाचा मोबाईलमुळे लागला तपास, पौड पोलीसांकडून 3 जणांना अटक

महावार्ता न्यूज: मुळशीतील बापूजीबुवा खिंडीत आढळलेल्या अनोळखी पुरूषाचे नाव पत्ता निष्पन्न करून पौड पोलीसांनी खुनाची उकल करीत काही तासात आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली आहे.
२६ ऑगस्टला घोटावडे ते हिंजवडी रोड कडेला बापुजीबुवा मंदीराचे अलीकडे एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले. रोडचे डावे बाजुस चारीत पडलेले प्रेत असुन दुर्गधी येत आहे अशी खबर पोलीसांना दिल्याने लागलीच घटनास्थळी अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक, विनायक देवकर सपोनि, रमेश गायकवाड सपोनि, श्रीकांत जाधव घटनास्थळी दाखल झाले.
पोलीसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत, चेहरा, हात, पायाची बोटे जंगली प्राण्यांनी खाल्याने ओळख पटत नव्हती. त्यावरुन पौड पोलीस ठाणेत अकस्मात मयताची शोध घेतला.
मयत हे अंदाजे ५ ते ६ दिवसापुर्वी घडले असावे यावरून लगतचे पोलीस ठाणे हिंजवडी, वाकड, भोसरी पोलीस ठाणे पिंपरी, पुणे शहर भागात या वर्णनाचे मिसींग दाखल आहे का, या अनुशंगाने मयताचा शोध पौड पोलीसांनी सुरू ठेवला . शोध घेत असताना मयताचे अंगावरील कपडयाचे वर्णन व उजव्या हाताचे पोटरीवरील असलेल्या टॅटु या वर्णनाचे मिसींग भोसरी पोलीस ठाणेत दाखल असल्याचे समजले. वर्णन मिळते जुळते असल्याने पोलीसांनी मिसींगचे नातेवाईकांना बोलावुन मयताचे फोटो, कपडयाचे फोटो, टॅटु दाखवले असता त्यांनी सदर इसम हा प्रशांत आनंदा डोळस रा. डोळसवस्ती अशोकनगर भोसरी पुणे हा असल्याचे सांगितले. मयताची ओळख पटविण्यात आली. नातेवाईकांकडे चौकशी करता त्याची
कोणाशी दुश्मनी,काही पैशाचा, जागेचा व्यवहारावरून भांडण आहे का, बाबत कोणावर काही संशय नसल्याचे सांगत असल्याने आणखी संभ्रम वाढत गेला.
मयताचा खून झाल्याचा संशय असल्याने पौड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मयताच्या मोबाईलचे सीडीआर, शेवटचे लोकेशन वगैरे माहिती सायबर पो.स्टे पुणे ग्रामीण याचे मदतीने तात्काळ प्राप्त करून पुढील तपास चालु ठेवला. मोबाईलचे सीडीआर
वरून दि.२१/८/२०२२ रोजी सायंकाळी एकाच नंबरवरून मयत इसमास ४ कॉल असल्याचे व त्यानंतर मयताचा मोबाईल
बंद झाल्याचे दिसत असल्याने शेवटचे कॉल असणारे नंबरचे नाव पत्ता माहिती घेतली असता सदर व्यक्‍ती शेखर तात्याराम पाटोळे रा. विठठलनगर लांडेवाडी भोसरी पुणे याचा निष्पन्न झाल्याने सपोनि गायकवाड यांनी भोसरी पोलीस ठाणेचे डिबी पथक याचे मदतीने सदर इसम शेखर तात्याराम पाटोळे यास ताबेत घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी करता शेखर तात्याराम पाटोळे याने सांगितले कि माझी मेव्हुणी हिचेशी मयत प्रशांत आनंदा डोळस याचे अनैतिक संबध असल्याचे व मी आणि मयत ज्या ठिकाणी कामास होतो तेथुन मयत प्रशांत डोळस याचे सांगणेवरून मला कामावरून काढुन टाकले याचे संशयावरून मी प्रशांत आनंदा
डोळस यास दारूची पार्टी करू असे सांगुन बोलावुन घेवुन माझे साथीदार लखन वाघमारे, बाबा असे
रिक्षात बसुन हिंजवडी मार्गे बापुजीबुवा मंदीराचे पुढे गोंडाबेवाडी ता. मुळशी भागात प्रशांत डोळसला गळा आवळुन खुन केला. मयतास रोडचे कडेला चारीत टाकुन दिले.
मयताचे भाऊ प्रविण आनंदा डोळस रा. अशोकनगर भोसरी पुणे यांनी फिर्याद दिल्याने पौड पोलीस ठाणेत गु. र.नं.
३५३२०२२ भादवि कलम ३६४, ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाचे पुढील तपासात सपोनि विनायक देवकर यांनी गुन्हयातील अटक आरोपी शेखर तात्याराम पाटोळे याचे साथीदार २) लखन भारकर वाघमारे वय २९ , रा. गोकुळनगर पठार वारजे पुणे ३) दत्ता उर्फ बाबा चत्रभुज शिनगारे वय २७ रा.आंबेडकरनगर लांडेवाडी भोसरी पुणे यांना शिताफीने अटक केली आहे. सदर आरोपींत यांनीच संगनमताने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

मुळशीत भोसरीतील फूलविक्रेत्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला, 7 दिवसापूर्वीच खून झाल्याचा संशय

मुळशीत भोसरीतील फूलविक्रेत्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला, 7 दिवसापूर्वीच खून झाल्याचा संशय

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close