राजकीय
Trending

मुळशी, कोथरूडला जोडणारा चांदणी चौक पूल शनिवारी रात्री पाडणार, ११ पर्यायी मार्गांचा रोडमॅप तयार, नवा पूल युद्धपातळीवर उभारणार

महावार्ता न्यूज : गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर शनिवारी 10 सप्टेंबरला रात्री मुळशी, कोथरूडला जोडणारा चांदणी चौक पूल पाडला जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मुंबई, सातारा, कोथरूड, मुळशी व बावधनकडे जाणाऱ्या 11 पर्यायी मार्ग खुले होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व एडिफिस इंजिनीअरिंगच्या तज्ज्ञांच्या पथकाने या परिसराची तसेच संबंधित पुलाची पाहणी केली आहे.
10 सप्टेंबरच्या रात्री उशिरापर्यंत पाडकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे रविवारी ढिगारा हटवता येईल. आठवड्याच्या दिवसांच्या तुलनेत रविवारी सामान्यत: कमी रहदारी असते. 4-6 तासांत पूर्णपणे काम संपवले जाईल आणि हा परिसर पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो. अतिरिक्त लेन टाकण्यास सुमारे 15 दिवस लागतील, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
आजपासून पूल पाडण्याबाबतच्या पूर्वतयारीचे काम सुरू झाले आहे. या कामाचा परिणाम या ठिकाणच्या वाहतुकीवर होणार नाही.
पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात पुलाची पाहणी केली.
हा पूल स्फोटकांच्या साह्याने पाडता येईल किंवा कसे, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे.
त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतरच पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी येथील पूल पाडला जाणार आहे. मात्र हा अल्पकालीन उपाय असल्याचे वाहतूकतज्ज्ञांचे मत आहे. पूल पाडल्याने येथील वाहतूककोंडी कमी होणार असली तरी इतर ठिकाणी ती शिफ्ट होईल. त्यामुळे मूळ प्रश्न कायम राहणार आहे. स्वत: मुख्यमंत्री सातारा याठिकाणी जात असताना चांदणी चौकात झालेल्या कोंडीत अडकले होते. त्यानंतर स्थानिकांनीही त्यांना निवेदन दिले होते. याप्रकरणी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पूल पाडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. तसेच कोंडी सोडवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील, या हेतूने परिसराची पाहणीही केली होती.
पुल पाडल्यानंतर खालील प्रमाणे वाहतुकीचे नियोजन
१. एनः.डी.ए./मुळशी ते बावधन पाषाण — वारजे — एन.डी’ए. व मुळशी कडून पाषाण बावधन कोथरुड वारजे कडे जाणारी वाहतूक नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरुन (रॅम्प कं. ९) वरुन सोडण्यात येईल.
२. एन.डी.ए./मुळशी — मुंबई — एन.डी.ए./मुळशी कडून मुंबई कडे जाणारीवाहतूक रॅम्प क. ३ मार्गे रॅम्प क. ७ वरुन सोडण्यात येईल. इतर रॅम्प व हायवे वरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच राहील.
३. मुंबई ते बावधन/पाषाण — कोथरुड — मुंबई ते बावधन/पाषाण ही वाहतूकपाषाण कनेक्‍्टर वरुन सोडण्यात येईल. मुंबई ते कोथरुड ही वाहतूक अस्तित्वातील कोथरुड रॅम्प वरुन खाली सोडण्यात येईल.
४. मुंबई ते मुळशी – ही वाहतूक कोथरुड अंडरपास एन.डी.ए चौक मार्गे मुळशीकडे सोडण्यात येइल.
५. बावधन / पाषाण ते मुंबई — सदरील वाहतूक कोथरुड पाषाण कनेक्टर — कोथरुड अंडरपास मार्गे वेदविहार एन.डी.ए रस्त्याकडून मुंबई हायवेवर जोडण्यात येईल.
६. बावधन/पाषाण ते सातारा — वारजे — सदरील वाहतूक पाषाण कनेक्टर नंतर हायवे वरुन सातारा व वारजे कडे सोडण्यात येईल.
६. कोथरुड ते मुंबई — सदरील वाहतूक कोथरुड अंडरपास ते वेदविहार एन.डी.ए.रस्त्यावरुन ते हायवेवर जोडण्यात येईल.
७. कोथरुड ते एन.डी.ए./मुळशी — ही वाहतूक कोथरुड अंडरपास नंतर एन.डी.ए. रॅम्प वरुन एन.डी.ए. कडे व पुढे मुळशी कडे सोडण्यात येईल.
८ कोथरुड ते सातारा/वारजे — ही वाहतूक सातारा हायवे सेवा रस्त्यावरील श्रंगेरीमठा जवळून हायवे वरुन सातारा व वारजे कडे वळविण्यात येईल.
९. सातारा ते एन.डी.ए./मुळशी — सदर वाहतूक वेदभवन सेवा रस्त्यावरुन एन.डी.ए. चौकातून एन.डी.ए. कडे व पुढे मुळशी कडे सोडण्यात येईल.
१०. सातारा ते बावधन/पाषाण — सदरील वाहतूक रॅम्प ७ ते मुळशी रोड व त्या पुढे नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरुन (रॅम्प कं. १) बावधन पाषाण कडे सोडण्यात येईल.
११. सातारा ते कोथरुड – ही वाहतूक वेदविहार सेवा रस्त्यावरुन अस्तित्वातील कोथरुड अंडरपास मार्गे सोडण्यात येईल.
वरील प्रकारे वाहतूक नियोजन केले असून सर्व आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक मराठी व इंग्रजीतून लावलेले आहेत.
सध्या चांदणी चौक फ्लायओव्हर व सेवा रस्त्याचे काम ७० टक्के काम पूर्ण झाले असून जून २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणजेच अस्तित्वातील अरुंद पूल पाडून त्या ठिकाणी ११९५ मी. लांब व ३६ मी. रुंद नविन पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे

बावधन पुलावरुन सध्या मुळशी ते पाषाण / बावधन, कोथरुड अशी एकेरी वाहतूक सुरु होती. पूल पाडल्यानंतर लगेचच नविन पुलाचे बांधकाम सुरु होईल व सेवा रस्त्यांचे पुलामुळे अडलेले काम पण सुरु होईल व काही दिवसातच वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटेल अशी अपेक्षा आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close