पुणेमहाराष्ट्र
Trending

शिर्डीतील संतांच्या अमृत मंथन मेळाव्यात राजेंद्र बांदल यांचाही व्हीआयपी सहभाग

महावार्ता न्यूज: जगप्रसिद्ध साईबाबांच्या शिर्डी देवस्थान आयोजित भारतातील संत- महात्म्याच्या अमृत मंथन मेळाव्यात व्ही आय पी म्हणून पेरिविंकल स्कूलचे संस्थापक राजेंद्र बांदल यांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रसिद्ध देवस्थान शिर्डी येथे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध योगी- महयोगी,संत महात्मे यांचा “अमृत मंथन मेळावा ” आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी श्री माणिक मोरे गुरुजी ( संत तुकारामांचे 10वे वंशज) , संत प्रवीण महाराज गोसावी (संत एकनाथ महाराजांचे 13वे वंशज) ,संत महंत तुकोजीबुवा, संत चल्लाप्पा महाराज, शंकर महाराज मठाचे मठाधिपती पाठक गुरुजी, संत सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, संत कलकीराम महाराज असे अनेक संत महात्मे व मठाधिपती यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या समवेत VIP पास देवून शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी यांनी पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनही देखील आमंत्रित केले होते.
या मेळाव्यात संत- महात्मा यांच्या मुखातील अमृतवाणी व त्यांच्या सह भोजन आस्वादाचा दुग्धशर्करा योग बांदल यांनी अनुभवला.अमृत मंथनाची प्रचिती आल्याचे राजेंद्र बांदल यांनी महावार्ताशी बोलताना सांगितले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close