
महावार्ता न्यूज : अचानक सुरू झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बावधन परिसरामध्ये हाहाकार झाला असून यामध्ये राम नदी ही न भूतो न भविष्यती अशा प्रकारे दुथडी भरून वाहत होती. या ढगफुटी सदृश पावसामुळे येथील माजी उपसरपंच दिलीप अण्णा दगडे यांच्या घरात तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले होते. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की यामुळे परिसरात बंद करून उभ्या असलेल्या चार चाकी कार सुद्धा ३० ते ४० फूट लांब वाहून गेल्या आहेत.पुणे कोकण या महामार्गावरून पुणे मुंबई महामार्गाला लागणाऱ्या मधल्या रस्त्याला रियान इंटरनॅशनल शाळेलगत असलेली भिंत कोसळून हा रस्ता बंद झाला होता परंतु स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने तातडीने हा रस्ता पुन्हा सुरू केला परंतु या रस्त्यावरून राम नदीचे पाणी वाहत असल्याने सध्या पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या काही चार चाकी तशाच मध्ये अडकलेल्या असून एक दुचाकी स्वार वाहून जाता जाता वाचला आहे. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे दिलीप अण्णा दगडे यांनी सांगितले. राम नदी ही इतिहासामध्ये कधीच एवढी दुथडी भरून वाहिली नव्हती आज बावधनकरांनी तिचे रौद्ररूप पाहिले असल्याचे मत येथील उद्योजक बापूसाहेब दगडे यांनी व्यक्त केले. राम नदीवर झालेले अतिक्रमण राम नदीत पोटामध्ये घेत असल्याचे आज दिसून आले. बावधन गावामध्ये अनेक बांधकामे झाले आहेत त्यामुळे जुने ओढून आले यांची दिशा बदलून टाकले आहे यामुळे हे पावसाचे पाणी जिकडे वाट मिळेल तिकडे घुसले आणि घरात रस्त्यात पाणी घुसले.
ढगफुटी पावसामुळे लवळे येथील ओढ्याला पूर आला त्यामुळे ओढ्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले सुरक्षिततेसाठी घरामधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
Share