क्राइम
Trending

पौडमध्ये पावाच्या आत आढळला टिशू पेपर, संगम बेकरी विरूद्ध तक्रार दाखल

महावार्ता न्यूज: मुळशीतील पौड येथील कोळवण रोड जवळील संगम बेकरीमध्ये कामगारांच्या बेजबाबदारपणामुळे पावाच्या आत टिशू पेपर आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ग्रामस्थांनी बेकरी चालक शराफत यास विचारणा केली असता टोलवा टोलवी ची उत्तरे दिल्याने कारवाई करण्याबाबत थेट तहसीलदारांकडे तक्रार देण्यात आली आहे.

पौड येथील संगम बेकरी मध्ये निकृष्ट दर्जाचे व भेसळ युक्त खाद्य पदार्थ बनवुन विक्री करीत असले बाबत सूरज पिंगळे यांनी तक्रार केली आहे.तक्रारदार जनता हाँटेल मध्ये मिसळ नाष्टा करण्यास गेले होते. तेव्हा हॉटेलमधुन घेतलेल्या पावामध्ये कागद आढळुन आला. याबाबत हॉटेल मालकाकडे तक्रार केली असता त्यांनी सदर निकृष्ट दर्जाचे पाव हे संगम बेकरी मधुन घेतल्याचे कळाले. याबाबत संगम बेकरीचे व्यवस्थापक शराफत अन्सारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हास उडवाउडवीची उत्तरे दिली.
संगम बेकरी मध्ये पुर्णपणे अस्वच्छता असून सदर बेकरीमधुन निघणा-या धुरामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर बेकरी बंद करणेकामी स्थानिक लोकांनी पीड ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी तक्रार केली होती परंतु पौड ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही असे तहसीलदार यांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close