पुणे
Trending
मुळशीतील चित्रपट अभिनेता प्रशांतचा पेरिविंकलकडून गौरव, पेरिविंकलच्या जडणघडणीत प्रशांतसारखे अनेक हिरे चमकत आहेत- राजेंद्र बांदल

महावार्ता न्यूज: मुळशीकर असलेला पेरिविंकल स्कूलचे माजी विद्यार्थी प्रशांत बेन्नी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत झळकणार आहे. सूर्या चित्रपटात अभिनेता असलेल्या प्रशांतचा पेरिविंकल स्कूलमध्ये अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
पिरंगुट येथील नूतन इमारतीत प्रशांत बेन्नीला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पेरिविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्चे संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी लेखक संजय दुधाणे, मुख्याध्यापक अभिजित टकले, बसवराज बेन्नी, सना ईनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कारानंतर राजेंद्र बांदल म्हणाले की, पेरिविंकलमध्ये शालेय जीवनात स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांत अभिनयाचे बाळकडू प्रशांतला मिळाले. त्याला नायकाच्या भूमिकेत बघताना नक्कीच पेरिविंकल शाळेच्या आम्हा सर्वांना अभिमान आहे. चित्रपट सृष्टी नव्हे तर मेडिकल, एमपीएसी परिक्षेत पेरिविंकलचे विद्यार्थी झळकत आहेत.
सत्काराला उत्तर देताना प्रशांत म्हणला की, मला मिळालेली प्रसिद्धी व प्रमुख भूमिका यासाठी त्याच्या पालकांबरोबरच शाळेचा व शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. शाळेतील स्नेहसंमेलनात शिक्षकांनी गुण ओळखून त्याप्रमाणे मार्गदर्शन केल्याने आज मी या उंचीवर पोहचलो.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांतचे वडील बसवराज बेन्नी यांनी पेरीविंकल शाळेचे आभार व्यक्त करीत संस्थापक राजेंद्र बांदल यांचा बेन्नी परिवाराकडून सत्कार केला.
प्रशांत बेन्नी हा बावधन बुद्रूक येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी. 2001 मध्ये तो या शाळेत दाखल झाला. तेव्हापासून त्याची अभिनयाची धडपड आणि त्याचे कलागुण शिक्षकांना दिसून आले. मॉन्टेसरीपासूनच त्याने सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेऊन आपल्या कलेला वळण देण्यास सुरुवात केली.
शाळेच्या दहा ते अकरा वर्षांच्या कालावधीत दहावीपर्यंत त्याला त्याच्या कलागुणांना पूर्णपणे वाव मिळाला, तो फक्त “पेरिविंकल ’च्या सांस्कृतिक प्रांगणातच. प्रशांतचे वडील बसवराज बेन्नी हे व्यावसायिक. त्यानिमित्ताने ते भूगाव येथे वास्तव्यास आले. त्यांनी प्रशांतला पेरिविंकल शाळेत दाखल केले. तेथून त्याने शालेय आणि अभिनयाचे शिक्षण घेतले आणि आज तो “सूर्या- दी पावर ऑफ लव्ह’ या चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत चमकताना दिसणार आहे.
Share