क्राइम
Trending

पिरंगुटमधील बंद पडलेल्या कंपनीत महिनाभर पडून होत मृतदेह, कुजलेल्या बेवारस मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन

महावार्ता न्यूज : मुळशीतील पिरंगुट हद्दीतील जवाहार इंडस्ट्रीजमधील बंद पडलेल्या कंपनीमध्ये कुजलेला मृतदेह आढळून आला. महिनाभरापूर्वी झालेल्या मृत शरीराची अवस्था इतकी वाईट होती की जागेवरच शवविच्छेदन करावे लागले.
मुळशी आपत्ती व्यवस्थापन चे प्रमोद बलकवडेसह पिरंगुट गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत कामगार वर्ग, डॉक्टर सह संपूर्ण टिम घटनास्थळी पोचली असता टिमने एक शर्टर उचकटून आत प्रवेश केला. समोरच एक व्यक्ती आत झोपलेल्या अवस्थेत आढळून आली.मृतदेह कुजलेला असल्याने शवविच्छेदन हे डॉक्टरांनी जागीच केले. खुप दिवसा पुर्वी मयत झाली असावी असा अंदाज पौड पोलिसांनी केला आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close