पुणे
Trending
पेरिविंकल विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने माजी मंत्री ते सिने अभिनेत्रींची जिंकली मने
शाखा विस्तारातून पेरीविंकल समुहाचे उड्डाण - आमदार शशिकांतजी शिंदे

महावार्ता न्यूज: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थी प्रगती केंद्र स्थानी असलेल्या पेरीविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पिरंगुट आणि पौड शाखेचे दिमाखदार स्नेहसम्मेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह – कोथरूड येथे संपन्न झाले.
युगांतर अशी आगळी वेगळी संकल्पना माजी जलसंपदा मंत्री व विद्यमान आमदार शशिकांतजी शिंदे, दिव्या फुगावकर उर्फ माऊ ( मुलगी झाली हो फेम ) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली होती. कालानुरूप शिक्षण क्षेत्रात तसेच मानवी आयुष्यातील बदल व त्याचे परिणाम “युगांतर” या संकल्पनेतून सादर करण्यात आले.
दिव्या फुगावकर यांचे मनोगत
https://www.facebook.com/groups/1lakhmulshikar/permalink/1934753313569072/?mibextid=Nif5oz
सरस्वती पूजन, दीप प्रज्ज्वलन व रंगमंच पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक ढमढेरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवसेना नेत्या संगीता पवळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष महादेव कोंढरे, महावार्ताचे संपादक संजय दुधाणे, पत्रकार विनोद माझिरे, माऊली पवळे, राहुल पवळे, अनिता इंगळे सदस्य जिल्हा परिषद, पौड सरपंच अजय कडू , लवळे ग्रामपंचायत उपसरपंच रंजीत राऊत , लवळे ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कृष्ण धवल चित्र पटातील गाण्यांच्या प्रदर्शनातून आधुनिक बदलत्या युगातील संकल्पनेवर आधारित गाण्यांच्या नृत्या विष्कारातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
अगदी हरिश्चंद्रजी यांच्या लख लख चंदेरी गाण्या पासून तर मेरा नाम चुन चुन चू , हम काले है तो क्या , मेरा जूता है जापानी , जीना यहा मरना यहाँ , ईना मीना डिका, डिस्को डान्सर अशा एक से बढ़कर एक गाण्यांवर बहारदार परफॉर्मन्स देऊन विद्यार्थ्यांनी पाहुणे व प्रेक्षकांची मने जिंकली.
मान्यवरांच्या हस्ते गतवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृति चिन्ह देऊन त्यांच्या गौरवाचे पाहुण्यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. पिरंगुट-पौड शाखेचे मुख्याध्यापक यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे मुख्याध्यापक टकले, पूनम पांढरे, सना इनामदार, पल्लवी नारखेडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि पाहुण्यांचे स्वागत श्री. वैभव मुरकुटे यांनी केले.
Share