
महावार्ता न्यूज ः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे बदल झाले आहेत. परिषदेच्या अध्यक्षपदी नागपूरचे खासदार रामदास तडस तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी पुण्याचे विजय बराटे यांची निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये 26 नोव्हेंबर 2022 रोजी अध्यक्ष शरद पवार यांनी अति तातडीची कार्यकारिणी बैठक बोलविली होती. या बैठकीला 20 कार्यकारिणीची पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत केवळ 2 ठराव मान्य झाले. दुसर्या ठरावात नव्या स्पोर्टस् कोडनुसार अध्यक्ष खासदार शरद पवारसह महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, खजिनदार सुरेश पाटील यांनी राजीनामे दिले व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची पुढीलप्रमाणे नवी कार्यकारिणी एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्ष – मा. रामदास तडस, खासदार
कार्याध्यक्ष – मा. काकासाहेब पवार
वरिष्ठ उपाध्यक्ष – मा. विजय बराटे
महासचिव – मा. दयानंद भक्त
कोषाध्यक्ष – मा. अमृता भोसले
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यातच होणार – ब्रीजभूषण सिंग यांची घोषणा
मुरलीधर मोहोळांनी स्वीकारले दिल्लीत आयोजनचे पत्र
👇👇👇👇👇👇👇
Share