
महावार्ता न्यूज : क्रीडा व ग्रामिण पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार, लेखक, क्रीडा संघटक प्रा. संजय दुधाणे यांचा भुकुममधील जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत विशेष गौरव करण्यात आला.
भुकुम ग्रामस्थ आयोजित कुस्ती मैदानात आयोजक सचिन हगवणे, श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय माझीरे, माजी उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे, सचिन बाळासाहेब आंग्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार विनोद माझिरे, उपसरपंच अंकुश प्रकाश खाटपे, ग्रामपंचायत सदस्य निलेश जयसिंगराव ननावरे, स्वयंभू प्रसाद शंकर भरतवंश, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास आंग्रे, उद्योजक राज आंग्रे, आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास आमले आदी मान्यवर उपस्थित होते.
Share