
महावार्ता न्यूज ः गुरूवर्य अच्युतराव कुलकर्णी यांच्या कृपाशिवार्दाने सोलापूर जिल्हातील माढा गावातील तडवळकर श्रीराम मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
9 डिसेंबरपासून माढामधील कसबा पेठतील तडवळकर श्रीराम मंदिरात भागवत कथेचा कार्यक्रम सुरू आहे. लातूरमधील हभप भागवताचार्य अमोल महाराज जोशी यांच्या सुश्राव्य, संगीतमय भागवत कथेचा आनंद भाविक घेत आहे. 15 डिसेंबरला सकाळी 12 ते 1 वाजेपर्यंत ग्रंथदिडी निघणार असून दुपारी 2 नंतर भागवत कथेच्या निरूपण होईल. 1 ते 5 महाप्रसादही असेल अशी माहिती मीना तडवळकर यांनी दिली आहे.
भागवत कथेचे आयोजन चंदन विजय तडवळकर व दर्शन विजय तडवळकर यांनी केले असून प्रमोद गोसावी, सुधीर गोसावी यांनी सहकार्य केले आहे. जप, विष्णुाासहस्त्र नाम, भागवत गीतेचे पठण भागवत सप्तााहात होत आहे.
गुरूवर्य अच्युतराव कुलकर्णी यांच्या प्ररेक मूर्तीमागे असलेल्या श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाल्याचा अनुभव पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती मीनाक्षी कुमकर यांना आला आहे. भागवत सप्ताहात पुण्यासह महाराष्ट्रातील गुरूवर्य अच्युतराव कुलकर्णी यांच्या भक्तांची पाऊले दर्शनासाठी श्रीराम मंदिरातकडे वळाली आहेत.
भागवत कथेचा व्हिडिओ पहाण्यासाठी क्लीक करा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=508320837750288&id=100061435175559&mibextid=Nif5oz
Share