
महावार्ता न्यूज: मुळशी तालुक्यातील गावठाणापासून २०० मीटरच्या आतील खातेदारांनी आपली जमिन अकृषिक करण्याची किचकट प्रक्रिया टाळून शासनाच्या या सुलभ योजनेचा लाभ घेणेसाठी तलाठी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा असे तहसीलदार अभय चव्हाण यांनी जाहिर केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शासन परिपत्रक क्रमांक एन ए पी-2021/प्रक-118/ज-1अ दिनांक 13/04/2022 चे कलम 122 अन्वये गावठाण म्हणून घोषित असलेल्या गावाच्या गावठाणापासून 200 मीटर च्या परिघातील गटांना अकृषीक आकारणी करून देणेबाबत शासनाने आदेशित केले आहे.
त्यासंदर्भाने तलाठी यांचेकडून सदर अकृषिक आकारणीची नोटीस प्राप्त करून घ्यावी.नमुद रक्कम शासन जमा केले नंतर, शासन निर्णयातील विहित नमुन्यातील सनद तहसिलदार कार्यालयामार्फत संबंधित खातेदारांना प्रदान करण्यात येणार असून सदर सनदीद्वारे आपले क्षेत्र अकृषिक झाल्याचे समजण्यात येणार असल्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी महावार्ताशी बोलताना सांगितले.
Share