खेळ खेळाडू
Trending
खेळाच्या कारकिर्दीला वयाचा अडथळा नाहीच, वयाच्या 53 व्या वर्षी महाराष्ट्र ऑलिंपिक ट्रायथलॉन स्पर्धेत कविता जाधवांची लक्षवेधी कामगिरी

महावार्ता न्यूज ः बहुतेक खेळाडूंची कारकीर्द चाळीशीत येण्यापूर्वीच थांबते. मात्र औरंगाबादच्या ५३ वर्षीय कविता अनिल जाधवचे, ट्रायथलीट म्हणून नवीन जीवन नुकतेच सुरू झाले आहे ते महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करूनच.
कविता हिने सांगितले, “मी नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी इतर तरुणांसोबत सायकल चालवत असे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये जेव्हां मी माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर तेव्हा मी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी पोहायला सुरुवात केली आणि मग, मला आढळले की मी ट्रायथलॉनमध्ये भाग घेऊ शकते. आणि मी येथे औरंगाबादचे प्रतिनिधित्व करत आहे.”
महाराष्ट्र ऑलिंपिक ट्रायथलॉन स्पर्धेत 51 वर्षीय महिला खेळाडू कविता जाधवांची लक्षवेधी कामगिरी
👇👇👇👇👇👇👇👇
५३ वर्षांची कविता ही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक खेळांमधील ट्रायथलॉनमधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे.व्यवसायाने ब्युटीशियन असलेल्या कविता हिला तिला मराठवाड्याची पहिली आयर्न मॅन विजेती बनायचे आहे.
“ बर्याच लोकांसाठी, ५० वर्षे हा खेळाचा शेवट असतो. पण माझ्यासाठी ५३ वर्षे ही सुरुवात आहे,” कविता म्हणाली.पतीचा प्रवास व्यवसाय तिची दोन मुले सांभाळतात.“राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव होता. मला शक्य होईल तोपर्यंत माझ्या जिल्ह्यासाठी खेळत राहायचे आहे,” कविताने स्पष्ट केले.
“येथे शर्यत पूर्ण करणारी ती सर्वात वयस्कर खेळाडू आहे. ती संपूर्ण मार्गात निर्दोष होती. तिच्या दृढनिश्चयामुळेच तिला अंतिम रेषा पार करण्यात मदत झाली,” असे ट्रायथलॉन संघटनेचे अभय देशमुख यांनी सांगितले.
Share