
महावार्ता न्यूज ः आपली यशाची परंपरा कायम राखत भूगांवमधील सुवर्णकन्या आयुषा प्रमोद इंगवलेने राज्य ऑलिम्पिक सॉफ्ट टेनिस स्पर्धेतही 1 सुवर्ण 1 रौप्य अशी पदकांची कमाई केली आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात संपलेल्या सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सोलापूर, जळगांव, बुलढाणा व औरंगाबादच्या तुल्यबळ खेळाडूंना पराभूत करून दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सांघिक स्पर्धेतही पुणे संघातून खेळताना ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. आयुषा 11 वित सर परशुराम विद्यालयात शिकत असून तिला तिला विल्सन अँड्रेव सर व मिलिंद मारणे सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे
आयुषा इंगवलेची कामगिरी – महिला दुहेरी
पुणे – जळगाव 3-0
पुणे – बुलढाणा 3-0
पुणे -सोलापूर 3-1
पुणे – बुलढाणा 3-1
आयुषा इंगवलेची कामगिरी – सांघिक स्पर्धा
पुणे – बुलढाणा 4-0
पुणे – औरंगाबाद 4-0
पुणे – जळगांव 4-1
पुणे – सोलापूर 2 – 4
Share