खेळ खेळाडू
Trending
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांची जयंती पुण्यात साजरी, बालेवाडी क्रीडानगरीत खाशाबांच्या आठवणींना उजाळा

पुणे : भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेता खाशाबा जाधव यांच्या 97 वी जयंती आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपसंचालक सुहास पाटील अनिल चोरमले, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्र पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास वनमाने आदी मान्यवर उपस्थित होते. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली .
खाशााबांच्या चरित्र पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांच्यासह क्रीडा उपसंचालक सुहास पाटील अनिल चोरमले यांनी खाशााबाच्या आठवणींना उजाळा दिला. 1952 च्या खाशााबांच्या पदकावर त्यांच्या पदकाचा वारसदार अजून महाराष्ट्रात का निर्माण झाला नाही ही खंत दुधाणे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधनीचे मुख्याध्यापक एस जे ढाकणे यांनी तर आभार प्रदर्शन अमिता जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा वाघचौरे यांनी केले.
Share