पुणे
Trending

पेरिविंकलचा सन्मान कायम स्मरणात राहील :महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

गेले १० वर्ष झालेल्या महाराष्ट्र केसरीवर पेरिविंकलची कायमच कौतुकाची थाप!!! महाराष्ट्र केसरी...... शिवराज राक्षे.

महावार्ता न्यूज:चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या इतिहासात  17 जानेवारी भाग्याचा दिवस होता. शाळेतील वार्षिक क्रीडा दिनाचे उदघाटन करण्यासाठी शाळेत, महाराष्ट्र केसरी २०२३ श्री शिवराजजी राक्षे यांचे आगमन झाले होते. त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी मुलांचा उत्साह द्विगुणित केला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली, उपस्थित मान्यवरांनी क्रीडा साहित्याचे पूजन केले. इयत्ता ८ वी व ९ विच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादर केले. मुलांमधील चपळता, समन्वय आणि समयसूचकतेचा कस लावणाऱ्या या क्रीडा प्रकाराची सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी खेळाच्या सर्व नियमांचे पालन करत खेळ खेळण्याची शपथ घेतली.
संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र बांदल सर यांनी शाल, श्रीफळ, भक्ती-शक्ती ची प्रतिमा तसेच 51000 ₹ देऊन श्री राक्षे यांचा सत्कार केला. “संस्थेने मला बोलवून माझा सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र बांदल सर यांचा आभारी आहे अशा शब्दात श्री शिवराज राक्षे यांनी संस्थेचे आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र चॅम्पियन श्री योगेश धावडे, माननीय श्री ओंकार दगडे आणि माननीय श्री गणेश भाऊ मोहोळ यांचाही सत्कार करण्यात आला.
खो खो मॅच चा टॉस महाराष्ट्र केसरी श्री शिवराज राक्षे यांच्या हस्ते करून पहिल्या मॅच ची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी श्री संदीप ढमढेरे, पैलवान नवनाथ राक्षे, श्री अनिश मोहोळ, शिवराज राक्षे, आग्रो आयडॉल श्री कैलास जाधव, वस्ताद बाळासाहेब दांगट, पैलवान बाळू बोडके, संचालक श्री यश बांदल आणि डायरेक्टर सौ रेखा बांदल आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ रुचिरा खानवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक श्री आदित्य पवार व श्री श्रेयस गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रुचा हल्लूर यांनी अतिशय नेटकेपणाने केले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close