
महावार्ता न्यूज ः मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार यांचे परिपूर्ण नियोजन, ग्रामपंचायतीकडून संदर्भ अभ्यास पुस्तकांचे मोफत वितरण आणि शिक्षकांची मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 19 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकवले आहे. अशी रेकॉर्डबे्रक कामगिरी केल्याबद्दल पुणे जिल्हयातून गटविकास अधिकारी संदिप जठार यांच्या कौतुक होत आहे.
काही वर्षांपूर्वी मुळशीतील मराठी शाळांची शैक्षणिक गुणवत्ता घसरत चालली असल्याचे चित्र होते. एकीकडे इंग्रजी शाळेत जाण्याचा कल वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत स्थानिक ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. तरीही गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी दूरदृष्टी असलेले गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी काही उपक्रम सुरू केले. शिष्यवृत्ती परिक्षा हा त्यातील एक यशस्वी उपक्रम ठरला आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पूर्ण माध्यमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेला बसविण्याचे नियोजन झाले. गेली 4 वर्ष हळूहळू गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा पल्ला वाढत गेला. यंदा तर विक्रमच केला. इयत्ता 5 वीतील परिक्षेत मुळशीतील 16 विद्यार्थी तर इयत्ता 8 वीचे 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. यात सर्वाधिक 19 विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे. कामगार, कष्टकरी कुटुंबातील मुलांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संपादन केलेल्या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षकांचे कौतुक होत असताना गटविकास अधिकारी संदिप जठार यांच्या यशस्वी प्रयास केल्याबद्दल अभिनंदन होत आहे.
मुळशीतून एकूण 2051 विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 परिक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यापैकी 1811 विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी 1437 विद्यार्थी अपात्र तर 374 पात्र ठरले, मात्र गुणवत्ता यादीत 16 विद्यार्थी आले. मुळशीतून एकूण 911 विद्यार्थ्यांनी इयत्ता 8 परिक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यापैकी 764 विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी 702 विद्यार्थी अपात्र तर 62 पात्र ठरले, मात्र गुणवत्ता यादीत 9 विद्यार्थी आले.
गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
स्वराज संदिप ढमाले, पिरंगुट
स्वरागिणी सचिन लोंढे, पिरंगुट
गौरी गणेश लासे, पिरंगुट
तनया पारसराम झोजे, कामतवाडी
आर्या ज्ञानेश्वर ऊम्बरटकर, कोंढूर
समिक्षा जयदिप ताकवले, कोंढूर
दिप्ती दयानंद चव्हाण, उरावडे
समृध्दी हनुमंत कोंढरे, कोंढूर
संस्कृती राघू झोरे, दासवे
हर्षवर्धन वैभव जोशी, हिंजवडी
संस्कार कुलदिप पवार, कासारसाई
प्रथमेश बाबूराव खंदारे, बावधन
स्वराज आनंद शिंदे, म्हाळुंगे
गजानन पद्माकर हिवराळे, बावधन
प्राजक्ता रवीशंकर लांडगे, माण
स्वप्नाली खंडेराव पवार, हिंजवडी
अंजली बाबू निम्मानवाड, माण
काजल शरद रानवडे, नांदे
सृष्टी दिलीप आढाव, हिंजवडी
Share