माय मुळशी
Trending
पिरंगुटसह ब्लॅक स्पाॅटची कामे मार्चपर्यंत न झाल्यास रोडवेज ब्लॅकलिस्ट होणार, मुळशी- कोलाड महामार्गच्या आमदार थोपटेंच्या दिवसभरातील 2 बैठकीत झाला निर्णय

महावार्ता न्यूज: आमदार संग्राम थोपटे हे आता मुळशी – कोलाड महामार्गबाबत अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सकाळी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख तर दुपारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपेलवार यांच्या कार्यालयात 2 महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या.
- सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत रोडवेज कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा तर दुपारच्या बैठकीत मार्च अखेर पिरंगुटसह सर्व ब्लॅक स्पाॅट मार्च 2023 अखेर पूर्ण करून घेण्याचा निर्णय झाला.
नवीन प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार संग्राम थोपटे, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, मुळशी काॅग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, शरद शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीला रोडवेज कंपनीचा कोणीच उपस्थित नसल्यामुळे थेट ठेकेदार अमित गोडख यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपेलवार यांनी फोन केला. ठेकेदार अमित गोडख यांनी पिरंगुट, लवळेफाटासह कासारअंबोली ते अंबडवेट रस्ता त्वरीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत भूगाव, पौड बाहयवळण रस्त्याचे काम तसेच जामगाव ते माले यामधील 700 मीटर लांबीचे काम त्वरीत पूर्ण करण्याबाबतही निर्णय झाला.
Share