
महावार्ता न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूलच्या सूस शाखेमध्ये जयहिंदच्या घोषात भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पेरिविंकल स्कूलच्या सूस शाखेमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी जागतिक पदक विजेता नेमबाज पटू, क्रीडा विभागाचे सह संचालक नवनाथ फडतरे , आंतरराष्ट्रीय पत्रकार संजय दुधाणे, इंडियन आयडॉल व सारेगमपचे गायक सुरेश कदम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेन्द्रजी बांदल व संचालिका रेखा बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे नवनाथ फडतरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला .

प्रजासत्ताक दिनाची सुरवात ध्वजवंदनेने करून सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व झेंडागीत गाऊन ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून संविधान प्रतिज्ञेचे इंग्रजी व मराठी भाषेतून वाचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादरीकरण नंतर पूर्व प्राथमिक विभागाच्या बालचमुंनी भारतभूमीवर जन्म घेतलेल्या विविध क्षेत्रातील थोर व्यक्तीरेखांचे म्हणजेच भारतमाता , झाशीची राणी , डॉ आंबेडकर , किरण बेदी , बाबा आमटे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पर्यंत हुबेहूब सादरीकरण अतिशय आत्मविश्वासाने केले . विद्यार्थ्यांनी गणतंत्र दिवसावर भाषणे सादर केली. विद्यार्थ्यानी विविध नृत्य सादर करून देशभक्ति व्यक्त केली.
अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर एक छोटीशी घटना सांगून सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा कसा आहे याचे सुरेख विवेचन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी त्यांच्या भाषणात केले.

आज पेरिविंकलला येऊन खरच प्रगत राष्ट्राचे स्वप्न खरे करणारे विद्यार्थी घडतील हे नक्की असे दुधाणे यांनी सांगितले.
सुरेल आवाजाची देणगी मिळालेले कुस्तीपटु सुरेश कदम यांनी देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमांत सर्वांची मने जिंकली. संपूर्ण परिसर त्यांच्या गाण्याने संगीतमय झाला.
एक खेळाडू हा फक्त खेळाच्या जोरावर एमपीएससी न देता ती पोस्ट घेऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे असे सांगून नवनाथ फडतरे यांनी खेळाचे महत्व पटवून देऊन खेळातही उत्तम करियर घडवू शकतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल , संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाने पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी , योगीता धाने ,अन्नपूर्णा यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रजासत्ताक दिनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रफुल्ला पाटील यांनी केले.
Share