महाराष्ट्र
Trending

भुकूूम मठात माद्य शुध्द दशमी उत्साहात साजरी, शेकडो भाविक संत गणोरेबाबांच्या चरणी लीन

महावार्ता न्यूज ः ः मुळशी तालुक्यातील भूकूम गावाजवळील हरिराम आश्रय मठात माघ शुद्ध दशमीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातून शेकडो भाविक संत गणोरेबाबांच्या चरणी लीन झाले होते.
कोरोनाच्या 3 वर्षांच्या खंडानंतर प्रथमच सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह हरिराम आश्रय मठात झाला. पहाटे संत गणोरेबाबा व संत सीतामाईंंच्या समाधी अभिषेक झाल्यानंतर संत गणोरेबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघाली. प्रवचन व किर्तनानंतर दुपारी 1 वाजता अन्नप्रसादाचा भंडाराचा शेकडो भाविक उपस्थित होते. संत तुकाराम महाराज व संत गणोरेबाबा यांच्या अनुग्रह दिनी गेली 55 वर्ष भुकूममध्ये माद्य शुद्ध दशमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
माद्य शुध्द दशमीच्या सोहळ्यास मुळशीकरांनी मोठी गर्दी केली होती. पेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, राष्ट्रवादीचे राजेंद्र हगवणे, मठाचे अध्यक्ष जयंती पटेल, विश्वस्त निनाद मुळे, विश्वस्त सुभाष तापडिया, बाबा कंधारे, निकीता सणस, रमेश सणस, भानुदास पानसरे, राम गायकवाड, वैभव पवळे, नामदेव माझिरे, गोरख दगडे, नंदकुमार दगडे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते. हभप एकनाथ हगवणे यांच्या प्रवचनानंतर गणेश कार्ले यांचे काल्याचे किर्तन झाले. सूत्रसचांलन दशरथ वहाळे यांनी केले.
संत तुकाराम गाथेचे व गणोरेबाबांच्या ॐ हा गुरू ग्रंथाचे पारायण, हरिपाठ असे सकाळचे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी श्री बाबांच्या अभंगाचे भजन, प्रवचन आणि रात्री कीर्तन अशी दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. 1956 मध्ये संतशिरोमणी तुकाराममहाराजांनी माघ शुद्ध दशमीच्या दिनी श्री गणोरेबाबांना स्वप्नात मंत्र दिला. हा मंत्र श्री बाबांनी 12 वर्षे जपला. या नामसाधनेच्या तपातूनच संत गणोरेबाबांचा जन्म झाला. माघ शुद्ध दशमीला संत तुकारामांनी उपदेश केल्याने या पुण्यदिनी श्री गणोरेबाबांनी हरिराम आश्रय मठावर 1968 पासून माघ शुध्द दशमीचा महोत्सवानिमित्त अखंड हरिराम सप्ताह भुकूम मठात सुरू केला. सुरुवातीला बाबांच्या काळात दशमीचा उत्सव एका दिवसाचा होता. कालांतराने सात दिवसाचा उत्सव सुरू करण्यात आला. याच उत्सवात अन्नप्रसादाचा भंडार्‍याचा कार्यक्रमाची प्रथा गणोरेबाबांनी रूढ करून ठेवली आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने गणोरेबाबांचे भक्त दरवर्षी या वार्षिक भंडारास येत असतात अशी माहिती हरिराम आश्रय मठाचे अध्यक्ष जयंतीशेठ पटेल यांनी दिली

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close