माय मुळशी
Trending
पेरिविंकलच्या सूस शाखत 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न, पेरिविंकलचे विद्यार्थी कोहिनूर सारखे झळकतील : API देवकर
पेरिविंकल चा विद्यार्थी हा उद्याचा IPS किंवा IAS ऑफीसर असेल - राजेंद्र बांदल

महावार्ता न्यूज: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सूस शाखेच्या इ. 10वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ सूस शाखेत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचा प्रारंभ हा सरस्वती पूजन व दीप्प्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी API विनायक देवकर , स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार, नांदे गावचे उपसरपंच सुनील जाधव , नांदे गावचे ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष रोहिदास रानवडे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, शाळेच्या मुख्याध्यापक सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत मान्यवरांच्या हस्ते शाळेकडून एक आठवण म्हणून भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्याना गौरविण्यात आले. इ 9 वी च्या विद्यर्थिनींनी सपने रे…. या निरोप समारंभाला साजेशा गाण्यावर अत्यंत सुंदर सादरीकरण केले.
फक्त अभ्यासात चांगले गुण मिळाले तरच पुढे जाता येते असे नसून नियोजनबद्ध आखणी व कामात चिकाटी व सातत्य ठेवले तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही असे सांगून प्रत्येकाला एक उत्तम नागरिक होता आले पाहिजे असे सांगून त्यांनी प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे व प्रत्येकात गुण दडलेले आहेत फक्त ओळखता आले पाहिजे.. हिरा कुठेही चमकतो तसेच माणूस मनापासून ठरवले तर सगळ करू शकतो. फक्त आयुष्यात आपले ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे वाटचाल केली की कुठलीच गोष्ट अवघड नसते असे प्रगल्भ विचार विद्यार्थ्याना सांगितले. परिस्थिती कशीही असली तरीही मनस्थिती चांगली असली की सगळे काही करता येते असे त्यांनी विद्यार्थ्याना स्वतःचे उदाहरण देऊन पटवून सांगितले. त्यांच्या स्वानुभवातून आलेले हे स्फूर्तीदायक विचार विद्यार्थ्याना नक्कीच प्रेरणा देऊन जातील.
तर स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्या बोधपर वक्तव्यांचा विद्यार्थ्यांस भावी पिढी घडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. कितीही मोठे झालात तरी शाळेला व शिक्षकांना कधीही विसरू नका असा गुरुमंत्र यांनी सर्वांना दिला.
ङसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी सर्व विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत व आज पेरिविंकल चा विद्यार्थी हा उद्याचा IPS किंवा IAS ऑफीसर असेल असे ध्येय निश्चित करून वाटचाल केली तर हे नक्की शक्य आहे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर सूस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी मधमाशी सारखे फक्त चांगले वेचून आयुष्याची वाटचाल करा व सातत्याने व नियमितपणे अभ्यास केला तर काही अवघड नाही असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
तर नांदे गावचे उपसरपंच श्री सुनील जाधव यांनी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 5000/- रुपयांची रोख देऊन रोख बक्षीस जाहीर केले.
कार्यक्रमाचे नियोजनशाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत, यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी , माधुरी धावडे , इ 10वी च्या वर्गशिक्षिका योगीता धाने यांच्या सहयोगाने सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रफुल्ला पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन इ 9वी च्या स्वरा चौधरी हिने केले.
Share