पुणे
Trending

मुळशीत महिला दिनानिमित्त मोफत फॅशन डिझायनिंगचा कोर्स, शिवसेनेच्या संगिता पवळे यांचा अभिनव उपक्रम

महावार्ता न्यूज ः महिला आघाडी शिवसेना व लिबर्टी इन्स्टिटयुट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीच्या वतीने 8 मार्च महिला दिनानिमित्त मुळशीतील महिलांयसाठी बेसिक फॅशन डिझायनिंगचा कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवसेनेच्य जिल्हा संघटिका संगिता बाळासाहेब पवळे यांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.
गेली अनेक पिरंगुटमधील वर्ष लिबर्टी इन्स्टिटयुट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीकडून महिलावर्ग सक्षमीकरणाचे कार्य सुरू आहे. आतापर्यंत 3000 पेक्षा अधिक महिलांना शिवणकामासोबत फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्याचे विक्रमी कामगिरी संगिता बाळासाहेब पवळे यांच्या मार्गदर्शनाव्दारे झाली आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून बेसिक फॅशन डिझायनिंगचा कोर्सचे मोफत असणार आहे. यासाठी 10 मार्च पूर्वी नावनोंदणी आवश्यक असल्याचे पिरंगुटच्या मा. सरपंच सुरेखा संभाजी पवळे यांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी पिरंगुटमधील सनशाईन जॉय फ्लॅट नं. 602 येथे किंवा मो. 9881302304 मोबाईल संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close