महाराष्ट्र
Trending
दुष्काळ-पूर मुक्ती कार्यशाळेत डॉ. राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन
डॉर्फ केटल कंपनीकडून राजगुरूनगरमध्ये कार्यशाळा

पुणे ः दुष्काळ व पूर मुक्त जगासाठी नाविन्यपूर्ण मॉडेलची निर्मिती करण्यासाठी डॉर्फ केटल केमिकल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाकडून पुण्याजवळील राजगुरूनगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह हे शिबिरात मार्गदर्शन लाभले.
राजगुरूनगरमधील पाडळी गावातील शिवयोग आश्रममध्ये 4 ते 6 मार्च दरम्यान डॉर्फ केटल केमिकल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाकडून दुष्काळ व पूर मुक्ति प्रशिक्षण शिबिराचे सुरू झाले आहे. डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह जल सहेलीचे डॉ. संजय सिंह, मिशन 500 चे डॉ. उज्वलकुमार चव्हाण, शिवम प्रतिष्ठानचे इंद्रजित देशमुख यांचे शिबिरात मार्गदर्शन मिळण आहे. शिबिरासाठी राज्यभरातून प्रतिसाद मिळाला असल्याचे डॉर्फ केटल केमिकल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख संतोष जगधने यांनी सांगितले.
शिबिरात दुष्काळ व पूर मुक्तीवर सखोल चर्चा सुरू जाणार असून पाणी प्रश्नाबाबत उपाय योजनांचा उहापोह केला जात आहे.
शिबिर कालावधीत हरिश भोसले गुरूजींकडून योग व ध्यान यांचे सत्रही सुरू आहे.
तरच महाराष्ट्र पुन्हा पाणीदार होईल : डाॅ. राजेंद्र सिंह
महाराष्ट्र राज्यातील भूगर्भातील 70 टक्के पाणी संपली आहे. एकेकाळी महाराष्ट्र पाणीदार होते आता दुष्काळामुळे सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. येथे वर्षा ऋतूचक्रनुसार पीक घेतले जात नाही. आर्थिक फायद्यानुसार पीके घेतली जातात. ऋतूचक्रनुसार पीक चक्र फिरले तर महाराष्ट्र पुन्हा पाणीदार राज्य होईल असा विश्वास राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
ठेकेदार मुक्त बंधारे व जलयुक्त शिवार योजना राबविली गेली तर महाराष्ट्राच्या भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होईल असे सांगून राजेंद्र सिंह शेवटी म्हणाले की, दुष्काळ-पूरामुळे जग विस्थापित होण्याचा तसेच तिसरे महायुद्ध धोका आहे.
Share