पुणे
Trending
मुळशीत रविवारी कुस्तीचा डंका, संजय दुधाणे यांना मुळशी केसरी प्रतिष्ठानाचा मुळशी रत्न पुरस्कार जाहिर
मुळशीतून महाराष्ट्र केसरी विजेते निर्माण होण्यासाठी स्पर्धेचे संयोजन ः राजेंद्र बांदल

महावार्ता न्यूज ः कुस्ती क्षेत्रामध्ये मानाची समजली जाणारी मुळशी किताब अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा या ठिकाणी रविवारी 12 मार्च रोजी करण्यात आले आहे. मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने होणार्या स्पर्धेनिमित्त मानाचा मुळशीरत्न पुरस्कार आंतरराष्ट्रीय पत्रकार, महावार्ताचे संपादक संजय दुधाणे यांच्यासह निवृत्त पोलिस निरिक्षक सुरेश मिरघे, शिवव्याख्याते धर्मराज हांडे यांना जाहिर झाला आहे.
तालुक्यात मल्लविद्येची मोठी परंपरा असून मुळशीतून महाराष्ट्र केसरी विजेते निर्माण होण्यासाठी स्पर्धेचे संयोजन करीत असल्याचे मुळशी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी महावार्ताशी बोलताना सांगितले. स्पर्धेचे हे विक्रमी सतरावे वर्ष आहे. ही स्पर्धा 45 किलो, 55 किलो, 57 किलो, 59 किलो,65 किलो, 70 किलो, 74 किलो व मुळशी केसरीच्या खुल्या वजनी गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे स्पर्धेमध्ये प्रत्येक गटामध्ये एकूण चार क्रमांक काढले जाणार असून सर्व गटातील पहिल्या 4 विजेत्यांना चांदीची नोट व ट्रॅकसूट तसेच रोख रक्कमेचे बक्षिस आहे.
स्पर्धेचे आयोजन मुळशी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, भास्कर मोहोळ, बाळासाहेब आमले, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
Share