क्राइम
Trending
मुळशीतील रिसोर्टमधून 5 लाख अमेरिकन डाॅलरवर डल्ला, 10 दिवसांत अमेरिकन महिलेला रक्कम देण्यात पौड पोलिसांना यश

महावार्ता न्यूज: मुळशीतील रिसोर्टमधून 5 लाख अमेरिकन डाॅलरवर डल्ला, 10 दिवसांत अमेरिकन महिलेला रक्कम देण्यात पौड पोलिसांना यशमहावार्ता न्यूज: मुळशीतील आत्मतन रिसोर्टमधून 25 फेब्रुवारीला चोरीला गेलेल्या 5 लाख अमेरिकन डॉलरच्या चोरटय़ाला 10 दिवसांत पौड पोलीसांना गजाआड करून न्यायालयीन प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करीत अमेरिकन महिलेला रक्कम देण्यात पौड पोलिसांना यश आले आहे.
आत्मतन रिसोर्टमधून अमेरिका न्यू यॉर्क गयाना सिटी येथील बीबी जमीना करीम यांचे US डॉलर चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन तपासपथक नेमले. घटनेचा तपास करण्याच्या सुचना दिल्या सदर ठिकाणी कामास असलेला विजय पटोई रा. मुंबई टीटवाळा ह्यास ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केलीची कबुली दिली . त्यास पोलिस कस्टडी घेऊन ह्या घटनेचा तपास पूर्ण करून 5943 US डॉलर आरोपी विजय पटोई ह्याच्या कढून हस्तगत करण्यात आले.
8/03/2023 रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदडाकरी सो.
शिवाजीनागर कोर्ट नं 7 यांनी फ़िर्यादि बीबी जमीना करीम रा :- अमेरिका न्यू यॉर्क गयाना सिटी याना सदरचे डॉलर परत देण्याचे आदेश दिले असुन त्याना त्यांचे US डॉलर तातडीने पौड पोलीसांनी परत केले.
सदर कामगिरी पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली Api भालचंद्र शिंदे ,Asi संतोष कुंभार,पोलीस नाईक नामदेव मोरे,दत्तात्रय अर्जुन,पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख,आकाश पाटील,अक्षय यादव यांनी सदर घटनेचा तपास करून आरोपीचा शोध लावून सदर आरोपीस पकडण्यास यश आले आहे.
Share