पुणे
Trending
पिरंगुटमध्ये मोफत फॅशन डिझायनिंग कोर्सला मोठा प्रतिसाद, संगीता पवळेंच्या महिला सक्षमीकरण उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक

महावार्ता न्यूज: शिवसेना महिला आघाडी व लिबर्टी इन्सट्यिट्युट ऑफ फॅशन टेक्नाॅलाॅजी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पिरंगुटमधील
बेसिक फॅशन डिझायनिंगचा कोर्स मोफत मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या जिल्हा संघटक महिला सक्षमीकरणासाठी संगीता पवळे उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
कोर्ससाठी 65 महिलांनी नावनोंदणी केली असून कोर्स साठी मुळशी तालुक्यातील स्थानिक महिलांबरोबर इतर तालुक्यातील महिलांनी सहभाग घेतला आहे. देण्यात आला आहे 5000 रुपये शुल्क असलेला बेसिक कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
महिला दिन साजरा करताना पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अधिकारी चोंधे ,कंधारे यांनी महिलांना बचत करण्या संदर्भात तसेच बॅकेच्या विविध कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. महिलांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी जिल्हा संघटिका संगीता बाळासाहेब पवळे, माजी सरपंचसुरेखा संभाजी पवळे, आशा रोहिदास पवळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
हर्षदा शेलारने प्रोफेशनल मेहंदी कोर्स विषयी सवलती च्या फी मध्ये कोर्स सुरू करण्याविषयक माहिती दिली.
माधवी वैराट यांनी आरी वर्क चे क्लासेस सवलतीच्या दरात महिलादिनाचे औचित्य साधून लिबर्टी इन्सट्यिट्युट ऑफ फॅशन टेक्नाॅलाॅजी पिरंगुट येथेच सुरू केले. या कोर्स मध्ये 130 प्रकारची इम्ब्राॅडयरी शिकवली जाणार आहे.
सायली चोंधे यांनी एकदिवसीय नथ बनविण्याच्या प्रशिक्षण याविषयी माहिती दिली ,हे प्रशिक्षण सुद्धा अत्यल्प फी मध्ये लिबर्टी पिरंगुट येथेच असणार आहे.
Share