
महावार्ता न्यूज: मुळशी इंड्रस्टीज असोसिएशन च्या वतीने मुळशी तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पिरंगुट येथील प्राज कंपनीच्या हॉल मध्ये महिला दिनाचे औचित्य साधित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा या कार्यक्रमा दरम्यान ८० कंपनीतील महिला वर्गानी उपस्थिती लावली होती.तेव्हा सर्व महिलांसाठी ॲडव्होकेट ऋतुजा गोवित्रीकर यांनी महिलांचे शोषण,महिलांचे कायदे,महीलांचे अधिकार व महिलांचे महत्त्व अशा विविध विषया वरती विशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा वेळी केसरी टूर्स च्या संचालिका माननीय झेलम चोबळ यांनी महिलांना आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही याची अनेक उदाहरणे देऊन या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली आजकाल महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने काम करतात व महिला कुठेही कमी नाहीत याची त्यांनी आवर्जून जाणीव करून दिली.
महिलांना स्वतःचे संरक्षण कायद्यात राहून कसे करावे याचे मार्गदर्शन पौड़ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष यादव यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी कायद्याचे पालन कसे करावे व कायदा हा महिलांसाठी किती उपयोगी आहे याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बद्दल स्नेहा साठे,सामाजिक कार्य म्हणून संगीता पवळे ,पोलीस क्षेत्रामध्ये अनिता रावळेकर,खेळामध्ये हिमानी चोंधे, गीता मालुसरे,योगा क्षेत्रामध्ये उमा जोशी यांच्या आपआपल्या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरी बद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तसेच यस फ़ यस ग्रुप चे डायरेक्टर श्री प्रशांत कोरे व साची इंजीनियरिंग च्या सुरुची शानभाग यांनाही गौरविण्यात आले .
एसोसिएशन चे अध्यक्ष सतीश कारंजकर,सचिव रमण गोवित्रीकर,तानाजी काळे,नारायण कुलकर्णी,एम.जी.मोरे,सिमा आढाव लक्ष्मीकांत जोशी,अतुल पिसाळ व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक मनोज यादव,संतोष कुंभार,पी.बी.कामठे,राजेंद्र गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
Share