माय मुळशी
Trending
भूगावच्या सरपंचपदी अर्चना रोहिदास सुर्वे बिनविरोध , निवडीनंतर तालुक्यासह जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

महावार्ता न्यूज : भूगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.अर्चना ताई रोहिदास सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याच्या निवडीचे जिल्ह्यात स्वागत होत आहे.
ग्रामपंचायत भूगाव येथील सरपंच सौ.वनिता शिवाजीतांगडे यांनी १५ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्या मुळे रिक्त झालेल्या जागेवर सौ.अर्चना ताई रोहिदास सुर्वे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली
निवडणुक अधिकारी म्हणुन मंडल अधिकारी कांबळे, निवडणुक सचिव म्हणुन ग्राम विकास अधिकारी प्रताप माने, , तलाठी पासलकर यांनी काम पाहिले या वेळी उपस्थितांमध्ये जि.प मा.अध्यक्ष सविता दगडे,जि.प. मा.सदस्य स्वाती हुलावळे, शिवसेना महिला संघटिका स्वाती ढमाले,जि.प.मा.सदस्य शांताराम इंगवले, जि प सदस्य शंकर मांडेकर,मा.सरपंच निकीता सणस, राहुल आबा शेडगे,सरपंच नितीन धावडे कोंढवे धावडे,मारुती कुरपे, कृ.उ.बाजार समिती उपाध्यक्ष दगडुकाका करंजावणे, मा.सभापती महादेव कोंढरे,स्वस्तिक चोंधे, सचिन आंग्रे,सचिन हगवणे,प्रसाद भरतवंशी,मा.सरपंच पदमा सातपुते, नारायण करंजावणे,निवृत्ती शेडगे,दिपक आबा करंजावणे,जितेंद्र इंगवले,अजित इंगवले,अरुण साळुंके,गुलाब चोंधे,एकनाथ शेडगे, दिलीप सुर्वे,शंकर शेडगे,संतोष सुर्वे,बाळकृष्ण सुर्वे, उपसरपंच कालिदास शेडगे,विशाल भिलारे,योगेश चोंधे,दिनेश सुर्वे,संकेत कांबळे,अमित घारे,वैशाली महेश सणस, वैशाली मनोहर सणस, सुरेखा शेडगे,योगेश्री शेडगे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Share